शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: February 28, 2016 00:34 IST

भुसावळनजीक मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने शनिवारी बडनेरा रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या बऱ्याचशा प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, ...

भुसावळजवळ डबे घसरले : काही गाड्या रद्द, काही वळविल्या बडनेरा : भुसावळनजीक मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने शनिवारी बडनेरा रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या बऱ्याचशा प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या वळविण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. दुपारनंतर मार्ग सुरळीत होईल, असे रेल्वेच्या सूत्राने सांगितले. शनिवार २७ फेब्रुवारी रोजी भुसावळनजिक मालगाडीचे डबे रुळाखाली आल्याने या मार्गाहून जाणाऱ्या प्रवासी तसेच मालवाहू गाड्यांच्या फेऱ्या थांबल्यात. बडनेऱ्याहून भुसावळमार्गे जाणाऱ्या तसेच नागपूर मार्गाकडे धावणाऱ्या प्रवासी गाड्या वेळेपेक्षा बराच उशिरा धावल्या. हटीया, लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, विशाखापट्टणम, नवजीवन एक्स्प्रेस, निजामुद्दीन, महाराष्ट्र एक्स्प्रेस यासह इतरही गाड्या नागपूरहून वळविण्यात आल्या तर अमरावती ते सुरत पॅसेंजर, भुसावळ ते नरखेड पॅसेंजर, नागपूर ते भुसावळ पॅसेंजर गाड्या रद्दच करण्यात आल्या. यासह नागपूर मार्गाकडे जाणाऱ्या बऱ्याचशा गाड्या उशिराने धावण्यात आल्यामुळे बडनेरा व अमरावती येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची एकच झुंबड उडाली होती. दुपारनंतर प्रवासी गाड्या सुरळीत धावतील, असे रेल्वेच्या सूत्राकडून सांगण्यात आले. प्रवाशांना आपल्या तिकिटा रद्द करून इतर वाहनांनी प्रवास करण्याची वेळ या घटनेमुळे आली. (शहर प्रतिनिधी)