शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे सामान्य तिकीट मोबाईलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:14 IST

रेल्वे खिडक्यांवर अनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी लांबलचक रांगेत तासन्तास उभे राहण्याची भानगड आता संपुष्टात आली असून, सामान्य तिकीट आता मोबाईलवर मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : भुसावळ मध्य रेल्वे विभागाचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतअमरावती : रेल्वे खिडक्यांवर अनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी लांबलचक रांगेत तासन्तास उभे राहण्याची भानगड आता संपुष्टात आली असून, सामान्य तिकीट आता मोबाईलवर मिळणार आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यूटीएस अ‍ॅपद्वारे प्रवासी घरबसल्या तिकीट मिळवू शकणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल.अनारक्षित तिकीट मोबाईलवर प्रवाशांना उपलब्ध कण्यात येणार असून, गुगल, गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, अ‍ॅपल स्टोअरवर जाऊन यूटीएस अ‍ॅप डाऊनलोड करून रजिस्ट झाल्यावर ते कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. येत्या काही दिवसांत ही सेवा भुसावळ मध्य रेल्वे विभागात सुरू होणार आहे. एक्स्प्रेस, मेल, पँसेजर गाड्यात अनारक्षित डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागांतर्गत खामगाव, शेगाव, बडनेरा, अमरावती, अकोला, मूर्तिजापूर, जळगाव, नांदुरा आदी रेल्वे स्थानकांचा समावेश असून, या स्थानकांच्या दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासी हे अ‍ॅप वापरून अनारक्षित तिकीट काढू शकतील. प्रवासादरम्यान तिकीट निरीक्षकांना छापील तिकीटऐवजी अ‍ॅपद्वारा काढलेली ईमेज दाखवविता येईल, अशी माहिती आहे.असे मिळेल तिकीटअनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असेल. मोबाईल क्रमांक, नाव, लिंग, जन्मतारीख, आयडी कार्ड क्रमांक, शहर आदी रजिस्टर केल्यानंतर वापरकर्त्याला एसएमएसद्वारा लॉग इन आयडी व पासवर्ड मिळेल. आर वॉलेट- प्रवासी आर वॉलेट वापरून तिकिटांची रक्कम भरू शकता येईल. यूटीएस आॅन मोबाईल डॉट इंडियन डॉट रेल डॉट जीओव्ही डॉट इन वापरून रिचार्ज केले जाऊ शकेल, असे एका रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.अनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य आहे. पासवर्ड मोबाईल क्रमांक असेल. रिचार्ज करून तिकीटांची रक्कम भरता येईल. हल्ली ही सुविधा सुरू झाली नाही; तथापि लवकरच ती सुरू होईल.- शरद सयाम,मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा