फोटो पी १६ चांदूररेल्वे
चांदूर रेल्वे : तालुक्यातील गौरखेडा, तरोडा तसेच बासलापूर या बेड्यावर धाड टाकून अवैध गावठी दारू नष्ट करण्यात आली. यामध्ये एकूण १.७५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी सकाळी ७.३० वाजता करण्यात आली. मोहा सडव्याचे ड्रम अक्षरश: जमिनीत गाडून ठेवले होते. सदर ड्रम पोलिसांनी शोधून ते बाहेर काढले.
माहितीनुसार, गौरखेडा, तरोडा पारधी बेडा येथे धाड टाकून तेथून २० हजार लिटर मोहा सडवा, प्लास्टिक ड्रम, ४० किलो गूळ, १० किलो तुरटी व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गिरीश सुभाष पवार (३६, रा. गौरखेडा) हा पसार झाला. यानंतर लगेच बासलापूर येथील पारधी बेड्यावर ३८ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करून नष्ट करण्यात आला. आरोपी राजा हायब्रीड पवार (रा. बासलापूर) हादेखील पसार झाला.
सदर कारवाई चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात कुऱ्हाचे ठाणेदार ईश्वर वर्गे, दत्तापूरचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशंकर खेडेकर, चांदूर रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक अरुण राऊत, पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण शिरसाट, प्रफुल माळोदे, आशिष राऊत, महेश प्रसाद, भूषण वंजारी, शारदा मडगे, पंकज शेंडे, जगदीश राठोड, सहदेव राठोड तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सुधीर जुमडे, पवन बांबडकर, चालक नीलेश पुरी यांनी केली.