शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जातीच्या दाखल्यासाठी उमेदवारांची धावपळ

By admin | Updated: November 3, 2016 00:17 IST

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर इच्छूक उमेदवारांची जातीचे दाखले मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

निवडणुकीची चाहूल : विविध ठिकाणच्या सेतू केंद्रांवर इच्छुकांची वाढत आहे गर्दीअमरावती: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर इच्छूक उमेदवारांची जातीचे दाखले मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या सेतू केंद्रावर यासाठीचे अर्ज येण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी वरील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षणसुध्दा काढण्यात आले आहे. यात जिल्हा परिषदेच्या गटासाठी, तर पंचायत समितीच्या गणाकरीता आणि महापालिकेच्या प्रभागासाठी आरक्षण सोडत काढली आहे. त्यामुळे आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले उमेदवारांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर नागरी सुविधा केंद्रावर जातीचे दाखले काढण्यासाठी दस्ताऐवजाची जुळवाजुळव आणि प्रशासकीय सोपस्कार करण्याचे दृष्टीेने धावपळ सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेनेसुध्दा नियोजन करण्याचे दृष्टीने तयारी केली आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक खुल्या गटातील इच्छुकांच्या जागांवर इतर मागास वर्गाचे (ओबीसी) आरक्षण पडले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी आता जातीचा दाखला मिळविण्यासाठी ६० वर्षापेक्षा अधिक वर्षाचे पुरावे सादर करणे आवश्यक असते. जुने पुरावे मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात इच्छुकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)