शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

यंदा ४० हजार हेक्टरने रबीची क्षेत्रवाढ

By admin | Updated: October 22, 2015 00:09 IST

यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यात २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.

२ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र : सर्वाधिक दीड लाख हेक्टरमध्ये हरभरालोकमत विशेषअमरावती : यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यात २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या १ लाख ७४ हजार ६९७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३९ हजार ३०३ हेक्टर इतकी क्षेत्रवाढ आहे. यामध्ये ७५ टक्के हेक्टर हरभऱ्याचे विक्रमी क्षेत्र असून ६० हजार क्षेत्रात गहू राहणार आहे. खरिपाचा हंगाम कमी पावसामुळे महिनाभर माघारला होता. त्यामुळे रबीचा हंगाम देखील उशिराने सुरू झाला आहे. सद्यस्थितीत २० हजार हेक्टरमध्ये रबीची पेरणी झाली आहे. यंदा कृषी विभागाद्वारे अमरावती तालुक्यात १५ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. चांदूररेल्वे १० हजार ६० हेक्टर, धामणगाव २५ हजार ६०० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर १४ हजार ६३० हेक्टर, भातकुली तालुक्यात १२ हजार ६७० हेक्टर, मोर्शी तालुक्यात १२ हजार ४०० हेक्टर, वरूड तालुक्यात १६ हजार ५१० हेक्टर, तिवसा १४ हजार ५७० हेक्टर, चांदूरबाजार १२ हजार ७७० हेक्टर, अचलपूर १३ हजार ७०० हेक्टर, दर्यापूर २८ हजार ७६० हेक्टर, अंजनगाव सुर्जी १२ हजार १३० हेक्टर, धारणी १७ हजार ५०० हेक्टर व चिखलदरा तालुक्यात ७ हजार ४०० हेक्टर रबीचे क्षेत्र आहे. रबीसाठी १ लाख ४८ हजार ८९० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मागील वर्षी ६१ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी करण्यात आली होती. हरभऱ्याचे १ लाख १० हजार ५६९ हेक्टर क्षेत्र होते. ईतर २ हजार २७५ हेक्टर क्षेत्र असे १ लाख ७४ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यंदा रबीच्या २ लाख १४ हजार हेक्टरचे नियोजन आहे. ६० हजार हेक्टरमध्ये गहू, दीड लाखमध्ये हरभरा व ४ हजार हेक्टरमध्ये ईतर पिके राहणार आहेत. ६० हजारात हेक्टरमध्ये गहूजिल्ह्यात यंदा ६० हजार हेक्टर क्षेत्रात गहू पीक राहणार आहे. सर्वाधिक १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धामणगाव तालुक्यात आहे. खारपाण पट्टा असणाऱ्या दर्यापूर तालुक्यात ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन राहणार आहे. अशी होणार क्षेत्रवाढयंदा रबीच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ३९ हजार ३०३ हेक्टरने क्षेत्रवाढ होत आहे. यामध्ये अमरावती ६ हजार ७८० हेक्टर, चांदूररेल्वे ३५७८, धामणगाव ४६५१, नांदगाव ४८६२, भातकुली ४७२६, मोर्शी ४२३९, वरूड ५८४७, तिवसा ४१४८, चांदूरबाजार ४२९१, चांदूरबाजार ६२६६, अंजनगाव ५३८६, दर्यापूर ८१६८, धारणी २८२४ व चिखलदरा तालुक्यात २७८६ हेक्टर क्षेत्र वाढणार आहे. दर्यापुरात सर्वाधिक हरभरा क्षेत्रयंदा दीड लाख हेक्टरमध्ये हरभऱ्याचे क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक २८ हजार हेक्टरमध्ये हरभरा राहणार आहे. चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी ४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.