शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा, केंद्रांवर तुडुंब गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST

गुरूवारी केंद्रांवर पोहोचली लस, जिल्ह्यात १६ ठिकाणी १३ हजार लसींचे वितरण अमरावती : चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी ४५ वर्षांवरील ...

गुरूवारी केंद्रांवर पोहोचली लस, जिल्ह्यात १६ ठिकाणी १३ हजार लसींचे वितरण

अमरावती : चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लस पोहोचली. मात्र. सकाळपासूनच शहरातील बहुतांश केंद्रावर लसीकरणासाठी रांगा होत्या. येथील दस्तुरनगरातील केंद्रावर शारीरिक अंतराचा फज्जा दिसून आला. ज्येष्ठांसाठी बसण्याची व्यवस्था नसल्याने येथे काही वेळ तारांबळ उडाली.

जिल्हा लस भांडारगृहात बुधवारी रात्री काेविशिल्ड १५ हजार ९०० तर, १८ ते ४४ वयोगटासाठी १२ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांसाठी १३ हजार लसींचे वाटप करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी जिल्ह्यातील १२ केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे वितरण करण्यात आले. मात्र, आता नागरिकांनी लसीकरण करण्याची मानसिकता तयार केली असताना आरोग्य प्रशासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. गुरुवारी तरुणांसाठी आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या लसींचा डोस घेण्यासाठीच लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांना लसींचा पहिला डोस केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. गुरुवार केंद्रांवर लस येणार म्हणून अनेकांनी सकाळी ६ वाजतापासूनच रांगा लावल्या होत्या. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस मिळणार नाही, असे केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगताच रांगेत उभे राहून परतावे लागले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्र, रेल्वे स्थानक मार्गालगतच्या संत गजानन महाराज मंदिरामागे ईर्विनचे केंद्र, दस्तुरनगर येथील लसीकरण केंद्र, मसानगंज येथील महापालिका शहरी आरोग्य केंद्रातही अनेकांना लसीविना परतावे लागले, हे विशेष. केंद्रावर होणारी गर्दी कोरोना संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत आहे.

--------------

केंद्रावर सोईसुविधांचा अभाव

हल्ली ऊन तापत असल्याने ज्येष्ठ नागरिक अधिक वेळ रांगेत उभे राहू शकत नाही. मात्र, लसीकरण केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा नसल्याने अनेकांना रांगेत ताटकळत राहावे लागते. महापालिका, आरोग्य प्रशासनाने ज्येष्ठांसाठी किमान बसण्याची व्यवस्था करावी, पिण्याचे पाणी, सावलीत उभे राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी किसनचंद साहू, तुकाराम मेश्राम या ज्येष्ठांनी केली आहे.

-------------------------

लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी कशी?

ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस उपलब्ध नसताना ऑनलाईन नोंदणी स्वीकारण्यात आली. निश्चित वेळेत येथील परिचर्या प्रशिक्षण केंद्रावर लसीकरणासाठी पोहोचलो असता ४५ वर्षांवरील व्यक्तींना केवळ दुसरा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी कशासाठी स्वीकारली जाते, असा सवाल रिपाईं (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष प्रदीप दंदे यांनी उपस्थित केला आहे.

----------------

जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर गुरूवारी कोविशिल्ड १३ हजार तर, कोव्हॅक्सिनचे १२ हजार लसींचे डोस वितरित करण्यात आले. यावेळी लस येण्यास विलंब झाला असून, सातत्याने शासनाकडे लसींची जादा मागणी केली जात आहे.

-दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती