शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा, केंद्रांवर तुडुंब गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

जिल्हा लस भांडारगृहात बुधवारी रात्री काेविशिल्ड १५ हजार ९०० तर, १८ ते ४४ वयोगटासाठी १२ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांसाठी १३ हजार लसींचे वाटप करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी जिल्ह्यातील १२ केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देगुरुवारी केंद्रांवर पोहोचली लस, जिल्ह्यात १६ ठिकाणी १३ हजार लसींचे वितरण, नियोजनाअभावी केंद्रांवर सावळागोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लस पोहोचली. मात्र. सकाळपासूनच शहरातील बहुतांश केंद्रावर लसीकरणासाठी रांगा होत्या. येथील दस्तुरनगरातील केंद्रावर शारीरिक अंतराचा फज्जा दिसून आला. ज्येष्ठांसाठी बसण्याची व्यवस्था नसल्याने येथे काही वेळ तारांबळ उडाली. जिल्हा लस भांडारगृहात बुधवारी रात्री काेविशिल्ड १५ हजार ९०० तर, १८ ते ४४ वयोगटासाठी १२ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांसाठी १३ हजार लसींचे वाटप करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी जिल्ह्यातील १२ केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे वितरण करण्यात आले. मात्र, आता नागरिकांनी लसीकरण करण्याची मानसिकता तयार केली असताना आरोग्य प्रशासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. गुरुवारी तरुणांसाठी आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या लसींचा डोस घेण्यासाठीच लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांना लसींचा पहिला डोस केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. गुरुवार केंद्रांवर लस येणार म्हणून अनेकांनी सकाळी ६ वाजतापासूनच रांगा लावल्या होत्या. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस मिळणार नाही, असे केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगताच रांगेत उभे राहून परतावे लागले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्र, रेल्वे स्थानक मार्गालगतच्या संत गजानन महाराज मंदिरामागे ईर्विनचे केंद्र, दस्तुरनगर येथील लसीकरण केंद्र, मसानगंज येथील महापालिका शहरी आरोग्य केंद्रातही अनेकांना लसीविना परतावे लागले, हे विशेष. केंद्रावर होणारी गर्दी कोरोना संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत आहे. प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन ठरविल्यास सावळागोंधळ निस्तारेल.

जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर गुरूवारी कोविशिल्ड १३ हजार तर, कोव्हॅक्सिनचे १२ हजार लसींचे डोस वितरित करण्यात आले. यावेळी लस येण्यास विलंब झाला असून, सातत्याने शासनाकडे लसींची जादा मागणी केली जात आहे.-दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

केंद्रावर सोई-सुविधांचा अभावऊन तापत असल्याने ज्येष्ठ नागरिक अधिक वेळ रांगेत उभे राहू शकत नाही. मात्र, लसीकरण केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा नसल्याने अनेकांना रांगेत ताटकळत राहावे लागते. महापालिका, आरोग्य प्रशासनाने ज्येष्ठांसाठी किमान बसण्याची व्यवस्था करावी, पिण्याचे पाणी, सावलीत उभे राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी किसनचंद साहू, तुकाराम मेश्राम यांनी केली.

लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी कशी?ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस उपलब्ध नसताना ऑनलाईन नोंदणी स्वीकारण्यात आली. निश्चित वेळेत येथील परिचर्या प्रशिक्षण केंद्रावर लसीकरणासाठी पोहोचलो असता ४५ वर्षांवरील व्यक्तींना केवळ दुसरा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी कशासाठी स्वीकारली जाते,  असा सवाल रिपाईं (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष प्रदीप दंदे यांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस