अमरावती : कचरू यांच्या पत्नी लीलाबाई यांना त्यांनी धीर दिला आणि मदतीचे आश्वासन दिले. यानंतर राहुल गांधी यांनी टोंगलाबाद येथील माणिकराव ठवकर, अशोक सातपैसे, रामदास अडकिने, शंकर अडकिने या चार कुटुंबांसोबत संवाद साधला. त्या कुटुंबांची व्यथा जाणून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.१५ किलोमीटरच्या झंझावाती पदयात्रेत राहुल गांधी यांनी हनुमान मंदिरात दर्शन घेतले. गुंजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राजना येथे भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरही ते आदराने नतमस्तक झालेत. त्यानंतर हिरापूर येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. गुरूवारी पहाटे ६ वाजतापासून हजारो कार्यकर्ते, शेतकरी राहुल गांधींच्या आगमनाच्या प्रतीक्षेत गुंजी येथे जमले होते. या झंझावाती पदयात्रेस हजारो नागरिकांचा सहभाग होता. ठिकठिकाणी राहुल गांधी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. या पदयात्रेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश झा, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे विधानसभा गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरेंद्रसिंग राजा बहाट, विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुकुल वासनिक, आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, आ. विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, चारुशीला राव (टोकस), सुनीता गावंडे, अमर काळे, सुधाकरराव गणगणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, सुनील केदार यांच्यासह प्रदेश व जिल्हा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संसदेत मांडणार शेतकऱ्यांचे प्रश्न
By admin | Updated: May 1, 2015 00:27 IST