शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश शिवणाऱ्यांपुढे ठाकला उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

दीड वर्षांपासून, हाताला काम नाही चांदूर बाजार : कोरोना महामारीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश शिवणाऱ्या कारागिरांच्या ...

दीड वर्षांपासून, हाताला काम नाही

चांदूर बाजार : कोरोना महामारीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश शिवणाऱ्या कारागिरांच्या हाताला काम नाही. तसेच रेडिमेड गणवेशालाही मागणी नसल्याने दुकानदारदेखील आर्थिक अडचणीत आले आहेत. यंदाही शाळा सुरू होणार की, नाही याबाबत अनिश्चितता असल्याने टेलरसह व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाळा, महाविद्यालये नियमित सुरू असताना विद्यार्थी कापड घेऊन टेलरकडे यायचे व आपल्या मापाचे गणवेश शिवून घ्यायचे. काही विद्यार्थी रेडिमेड दुकानातून गणवेश विकत घ्यायचे. दोन्ही व्यावसायिकांचा धंदा दोन हंगामात अडचणीत आला आहे.

टेलरकडे शाळेच्या गणवेशासोबतच लग्नसराईतील ही कपडे नसल्यागत जमा आहे. कोरोनामुळे मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत विवाह समारंभाला परवानगी दिल्याने अनेकांनी घरीच विवाह उरकला. त्यामुळे कपडे शिवण्यापेक्षा रेडिमेडवरच भर दिला आहे. याचाही परिणाम टेलरच्या व्यवसायावर पडला आहे. आता अटी, शर्तीच्या अधीन राहून काही व्यवसाय सुरू झाल्याने दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. अनावश्यक खर्च करण्यासाठी सर्वसामान्यांकडे पैसा शिल्लक नसल्याने वेळ भागविणे सुरू आहे. यामुळे नवीन कापड खरेदी करून टेलरकडे शिवायला टाकणे सध्या बंदच आहे. शहरात बऱ्याच टेलरच्या दुकानासमोर येथे शाळेचे गणवेश शिवून मिळतील व प्रत्येक शाळा, कॉलेजचे गणवेशाचे कापडही उपलब्ध आहे. अशा पाट्या लावण्याची वेळच आली नाही. साधारणपणे ग्रामीण भागात १५ ऑगस्टपर्यंत हे काम चालत होते. मात्र शाळा बंद असल्याने हे कामही बंद आहे. त्यामुळे व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे.