शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्णा प्रकल्प यंत्रणा सज्ज

By admin | Updated: June 3, 2015 00:32 IST

धरण जेवढं जीवन जगण्याला फायदेशीर ठरतं तेवढंच ते मरणालाही कारणीभूत ठरतं,याचा प्रत्यय गेल्यावर्षी २७ जुलैच्या ...

देखभालीचा करार : भजदई - सावलमेंढ्याशी जोडली स्वयंचलित यंत्रणा सुरेश सवळे ल्ल चांदूरबाजारधरण जेवढं जीवन जगण्याला फायदेशीर ठरतं तेवढंच ते मरणालाही कारणीभूत ठरतं,याचा प्रत्यय गेल्यावर्षी २७ जुलैच्या सकाळी ११ ते १ वाजता दोन तासात पूर्णाकाठच्या सुमारे १५०० गावांना आणून दिला होता. याचा सर्वाधिक फटका पूर्णा धरणानजीकच्या ब्राम्हणवाडा (थडी) व देऊरवाडा या गावांना बसला होता. या प्रलयात दोन जीव गेले तर १०० कोटींच्या संपत्तीचे नुकसान झाले होते. या घटनेला दोन्ही प्रशासनातील समन्वयाचा अभाव जितका दोषी असला तितकाच दोष धरणस्थळावरील कार्यान्वित नसलेली संगणकीय स्वयंचलित प्रणाली व धरणामागे असलेल्या ‘बापजई’ येथील अचानक झालेली ‘ढगफुटी’ हे सुद्धा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. धरणाची निर्मिती केली जाते. मात्र त्याच्या देखभालीवर करण्यात येणाऱ्या खर्चासाठी निधीची उपलब्धता केली जात नाही. याचा प्रत्यय पूर्णा प्रकल्पावरील आतापर्यंत नादुरूस्त असलेल्या स्वयंचलित संगणकीय प्रणालीवरून दिसून आले. गेल्या वर्षीच्या कटू अनुभवाची गंभीर दखल पाटबंधारे विभागाने यावेळी घेऊन पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावासाची पूर्वसूचना देणारी स्वयंचलित संगणकीय यंत्रणा पूर्णा प्रकल्प स्थळावर कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या देखभालीसाठी मेकॅट्रॉनिक्स कंपनी पुणे यांचेसोबत अप्पर वर्धा डॅम डिव्हीजन या विभागाने सन २०१९ पर्यंत करण्यात आला आहेत. या करारात जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्प व अप्पर वर्धा या दोन प्रकल्पांचा समावेश आहे.मध्यप्रदेशातील भगदई येथे पूर्णा नदीचा उगम आहे तर सावलमेंढा येथे या धरणाचे मध्य केंद्र आहे. गेल्या वर्षी भगदई येथे झालेला मुसळधार पाऊस व बापजई येथे झालेली ढगफुटी यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत २ तासांत ५० सें. मी. पासून तर ३ मीटर धरणाची दारे उघडल्या गेली. यातून दर सेकंदाला २४७६ घनमीटर पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे महाप्रलय निर्माण झाला आणि त्यात जीवितहानीसह कोट्यवधींच्या संपत्तीचे नुकसान झाले होते.पूर्णा धरणस्थळावरील स्वयंचलित संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणातील पाण्याच्या पातळीची माहिती या प्रणालीवर क्षणात प्राप्त होणार आहे. या प्रणालीवर देखभालीसाठी कंपनीकडून कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून याठिकाणी पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहतील.- आशिष राऊत,सहायक अभियंता, पूर्णा प्रकल्प.गेल्या वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी पूर्णा प्रकल्पावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. सध्या धरणातील जलपातळी ४४६.६६ मीटर इतकी असून २२.३२ द. ल.घ.मी. जलसाठा आहे. याची टक्केवारी ५३.४४ इतकी आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाईची समस्या नाही. - सागर चौधरी,सहायक अभियंता,पूर्णा प्रकल्प.