शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेकडो गावांची तहान भागविणारी ‘पूर्णा माय’ कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:31 IST

तालुक्यातील पूर्णा धरणाची पातळी दहा वर्षानंतर पहिल्यांदाच अल्प पावसामुळे खालावली आहे.

ठळक मुद्देजलसंकट : २७ टक्केच जलसाठा शिल्लक, दिवसाआड पाणी

सुमीत हरकुटलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तालुक्यातील पूर्णा धरणाची पातळी दहा वर्षानंतर पहिल्यांदाच अल्प पावसामुळे खालावली आहे. धरणात ७ आॅगस्टपर्यंत अल्प जलसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात तालुक्यातील जलसमस्या गंभीर होणार आहे. शेकडो गावांची तहान भागवणारी पूर्णामाय पहिल्यांदाच कोरडी पडल्याची स्थिती आहे.जिल्ह्यातील १०७ गावांची तहान भागविण्याकरिता सातपुड्याच्या पायथ्याशी विश्रोळी गावाजवळ पूर्णा नदीवर प्रकल्प उभारण्यात आला आहे. याप्रकल्पात सध्या ९.६२३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाणीसाठ्याची टक्केवारी २७.२१ टक्के इतकी आहे. यामुळे कालव्याद्वारे शेतीला पाणी पुरवणे बंद करण्यात आले आहे तर चांदूरबाजार व भातकुली तालुक्यातील १०७ गावांना याधरणाचा पिण्याकरिता पाणीपुरवठा करण्यात येतो. दररोज यागावांना १९ दशलक्ष लीटर प्रतिदिवस शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्यात येतो तर ५४०० हेक्टर शेतीला सुद्धा पाणी पुरविण्यात येत होते. धरणात मागीलवर्षी आजपर्यंत २१.८८५२ द.ल.घ.मी. म्हणजेच ६१.८८ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यातुलनेत यावर्षी अल्प पावसामुळे हा जलसाठा अतिशय कमी असल्याने यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. मागीलवर्षी २ नोव्हेंबर रोजी धरणात ९४.६८ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे धरणातून कालव्याच्या मार्गे हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरविणे शक्य झाले होते. मात्र, यावर्षी पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही धरणात पाणी गोळा झालेले नाही. त्यामुळे यावर्षी नागरिकांनी पाणी जपून वापरावे म्हणजे पेयजलाची टंचाई भासणार नाही. यंदा धरणाचे दरवाजे एकदाही उघडण्यात आले नसल्याची माहिती पूर्णा प्रकल्पाचे उपअभियंता अक्षय इरजकर यांनी दिली.जलसंकट : २७ टक्केच जलसाठा शिल्लक, दिवसाआड पाणीपाण्याची काटकसर गरजेचीसद्यस्थितीत धरणात अल्प जलसाठा उपलब्ध असून विसर्ग करणाºया गेटवर फक्त १४ सें.मी. इतके पाणी आहे. या धरणातून चांदूरबाजार शहरात एक दिवसीआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र,पुढेही पाऊस न पडल्यास पाण्यासाठी परिसरात हाहाकार माजू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आजच पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे झाले आहे.तीर्थ विसर्जनासाठीही नाही पाणीआसेगाव पूर्णा : पूर्णानदीच्या काठावर अनेक गावे आहेत. या गावांमध्ये सणानिमित्त पूर्णानदीत तीर्थ विर्सजन करण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा अत्यल्प पावसामुळे पूर्णा नदीपात्रात पाणी नसल्याने नळाच्या पाण्याने नदीत तीर्थ विसर्जन करण्याची वेळ नागरिकांवर आली. नागपंचमीच्या दिवशी नागरिकांनी नळाचे पाणी पाईपच्या सहाय्याने नदीपर्यंत आणून नागपंचमीचे सोपस्कार पूर्ण केले. यावेळी देवाकडे पाण्यासाठी साकडे घालण्यात आले.