शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागात लोकसेवा हमी कायदा अंमलबजावणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:33 IST

वनविभागाने लोकसेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, प्रथम व द्वितीय अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार संबंधित प्राधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावण्याचे निर्देश महसूल व वनविभागाचे सहसचिवांनी दिले आहे.

ठळक मुद्देअपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती : अधिसूचनेनुसार कर्तव्य बजावण्याचे निर्देश

आॅनलाईन लोकमतअमरावती : वनविभागाने लोकसेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, प्रथम व द्वितीय अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार संबंधित प्राधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावण्याचे निर्देश महसूल व वनविभागाचे सहसचिवांनी दिले आहे.‘वनविभागाने लोकसेवा हमी कायदा गुंडाळला’ यासंदर्भात ‘लोकमत’ने २२ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वनविभागाने सेवा हमी कायद्यासंदर्भात अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईबाबत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. महाराष्ट्र लोकसेवा हमी अध्यादेश २०१५ मधील कलम ३ चे पोट कलम (१) द्वारा प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागामार्फत प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ यांनी पात्र व्यक्तींना देण्यात येणाºया लोकसेवा आणि अध्यादेशानुसार लोकसेवा देण्याकरिता विहित कालमर्यादेसह प्रथम आणि द्वितीय अपील अधिकारी नियुक्त करण्याचे कळविले आहे. लोकसेवा कायद्यांतर्गत सेवा मिळविण्यासाठी वनविभागाने वेब पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह लोकसेवांसाठी आॅनलाइन अर्ज देता येणार आहे.अधिसूचनेनुसार लोकसेवा कायद्याची अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. अधिसूचनेनुसार प्रथम व द्वितीय प्राधिकाऱ्यांकडे जबाबदारीदेखील सोपविल्याचे अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.हे आहेत प्रथम अपील प्राधिकारीशासन अधिसूचेनुसार वनविभागाने प्रथम अपील प्राधिकारी म्हणून मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, वनसंरक्षक (वन्यजीव), विभागीय व्यवस्थापक (वनप्रकल्प), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), जिल्हाधिकारी (महाराष्ट्र वृक्षतोड विनियमन, अधिनियम) यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.