शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांच्या अधिकाराचे पुरावे द्या

By admin | Updated: June 7, 2016 07:35 IST

यावर प्रशासनाच्यावतीने सीईओ सुनील पाटील यांनी रक्कमेला मंजुरी दिली जाते,

अमरावती : यावर प्रशासनाच्यावतीने सीईओ सुनील पाटील यांनी रक्कमेला मंजुरी दिली जाते, असे सभागृहात स्पष्ट केले. मग, नियोजनाचे अधिकार कुणाला, यावरसुध्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जाब विचारला असता सर्व नियोजनाचे अधिकार सभागृहाने बहुमताने अध्यक्षांना दिल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत अध्यक्षांना नियोजनाचे कुठलेही अधिकार नाहीत, असे सांगितले. जर अध्यक्षांना अधिकार असतील तर त्याचा पुरावा द्या, असे फर्मावल्याने सभागृहात गदारोळ झाला. अशातच सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. विकासनिधीचे नियोजन व कामांना मंजुरी देण्याचे सर्वस्वी अधिकार जिल्हा परिषद सभागृहाचे आहेत. तशी तरतूद सुध्दा शासनाने केली आहे. मग, सत्ताधारी या आदेशाची पायमल्ली करतातच कशी, यावरून वातावरण तापले. असे प्रकार सभागृहात होत असतील तर ही मनमानी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, आतापर्यंत परंपरेनुसार अध्यक्षांनाच नियोजनाचे अधिकार देण्यात आले. मग आता का नाही, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यावर पीठासीन सभापती तथा अध्यक्ष यांनी रोलिंग द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर काहीच न बोलता तीन महिन्यांतून एकदा होणारी सर्वसाधारण सभा अवघ्या तासाभरात गुंडाळण्यात आली. तत्पूर्वी माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी त्यांच्या सर्कलला देण्यात आलेल्या सुमारे ३० लाख रूपयांच्या निधीतील विकासाची जी कामे प्रस्तावित केली, त्या कामात सत्ताधाऱ्यांनी परस्पर बदल करून हा निधी दुसऱ्याच कामासाठी वळविला. यावर सुरेखा ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत अध्यक्षांना जाब विचारला. मात्र, यावरही कुठलाच निर्णय देण्यात आला नाही. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सुधीर सूर्यवंशी, रवींद्र मुंदे, अभिजित ढेपे, प्रताप अभ्यंकर, महेंद्रसिंग गैलवार, सदाशिव खडके, मनोहर सुने, मोहन सिंगवी, मोहन पाटील, प्रवीण घुईखेडकर, विक्रम ठाकरे, प्रमोद वाकोडे, प्रेमा खलोकार, रंजना उईके, निशांत जाधव, बापूराव गायकवाड, ममता भांबुरकर, मंदा गवई, संगीता सवई, सभापती विनोद टेकाडे. आशिष धर्माळे, सदस्य तसेच सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ जे. एन आभाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे, कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ, डेप्युटी सीईओ कैलास घोडके, कार्यकारी अभियंता के. टी. उमाळकर, शिक्षणाधिकारी एस. एम. पानझाडे, समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, डीएचओ नितीन भालेराव, शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड, पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके व खातेप्रमुख उपस्थित होते.