अमरावती : पेढी प्रकल्प पुनर्वसितांच्या गरजा तातडीने पूर्ण करा. यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी आ. रवि राणा यांनी अधिकाऱ्यांना दिली. पेढी प्रकल्पमुळे बाधित कुंड खुर्द, गोपगव्हाण, अळणगाव, कुंड सर्जापूर, हातुर्णा, सावरखेड, ततारपूर या गावांच्या पुनर्वसनासंदर्भात तेथील नागरिक, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व सर्व यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची आमदार रवि राणा यांनी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीमध्ये नागरिकांनी आ. राणा यांच्याकडे त्यांना उद्भवणाऱ्या समस्या मांडल्या.
घरकुल बांधकामासाठी निधी, रस्ता-नाल्या, पथदिवे, पाण्याची व्यवस्था नसल्याने या पाच गावांतील नागरिक त्रस्त आहेत. अधिकारी वारंवार टोलवाटोलवी करतात, असा आक्षेप युवा स्वाभिमान तालुकाध्यक्ष मंगेश पाटीलसह नागरिकांनी मांडला. यावेळी आ. राणा यांनी ग्रामस्थांना तातडीने सुविधा देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला कार्यकारी अभियंता (पेढी प्रकल्प) पटले, उपकार्यकारी अधिकारी (पंचायत) मानकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) मोरे, मजीप्रा कार्यकारी अभियंता सोळंके, गटविकास अधिकारी विजय रहाटे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उमेश ढोणे, सुनील राणा, विनोद गुहे, विनोद जायसवाल, गिरीश कासट, आशिष कावरे, अजय बोबडे, ज्ञानेश्वर कळसकर, नानासाहेब दुर्वे, धरतिनाथ गोरकर, सपना चव्हाण, भूषण पाने, सविता जोंधळे, विमा उमाळे , रत्नाबाई उथाळ , अनिलराव तायडे , प्रेमीला बपले , राजेंद्र सिरसाठ , विक्की ठाकुर , राजेश जोधळे , गणेशसिंग चव्हाण, नारायण वघले, गोकुलराव वानखडे, सुष्मा मोरे, संगीता डाबेराव, सतीश मेटांगे, गोतम खंडारे, शंकर तायडे, संदीप मेटांंगे, पंजाबराव दुर्गे, भारत मानकर, कृष्णराव मानकर, कृष्णराव वानवडे, शकील शाह, चंदू खांडेकर, विद्याधर पवार, हारूण शहा, जावेद अली, अनिल गोमासे, ज्ञानेश्वर बोरगडे, जनार्दन तायडे, अतुल डाहे, प्रकाश अढाऊ, इंद्रपाल शेकर, अमित इंगोले, राहुल बोरगडे, अमिन इंगोले, अतुल मेश्राम, प्रवीण तायडे आदी उपस्थित होते.