शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

शिधापत्रिका वितरणातील अनियमिततेवर बोट ठेवून संबंधित दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश ना. बच्चू कडू यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटनेसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांचा लेखी खुलासा ग्राह्य धरण्यात आला नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बच्चू कडू यांच्या आदेशाला विरोध

दर्यापूर : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुरवठा निरीक्षक प्रमोद काळे व सपना भोवते यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. त्या आदेशाविरुद्ध गुरुवारी दर्यापूर तहसीलमधील महसूल विभागाचे कामकाज ठप्प राहिले. चौकशी न करता कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढू नयेत, अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.शिधापत्रिका वितरणातील अनियमिततेवर बोट ठेवून संबंधित दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश ना. बच्चू कडू यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटनेसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांचा लेखी खुलासा ग्राह्य धरण्यात आला नाही. तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई, पाठविलेला निलंबनाचा प्रस्ताव नियमसंगत नाही. लोकसेवा हक्क अधिनियमात सरळ निलंबनाची तरतूद नाही. त्यामुळे काळे व भोवते यांचा निलंबनाचा प्रस्ताव रद्द करावा, अशी विनंती केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नामदेव मेटांगे, राज्य सहसचिव आशिष ढवळे, अमोल दांडगे यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू