शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

एचटीबीटी बियाण्यांची लागवडीस मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST

अमरावती : खरीप हंगाच्या पार्श्वभूमीवर शिवारात पेरणीपूर्व मशागत सुरू आहे. शेतकऱ्यांनी खरिपासाठी बीजी-२ या शासनमान्यता बियाण्यांची लागवड करावी. याशिवाय ...

अमरावती : खरीप हंगाच्या पार्श्वभूमीवर शिवारात पेरणीपूर्व मशागत सुरू आहे. शेतकऱ्यांनी खरिपासाठी बीजी-२ या शासनमान्यता बियाण्यांची लागवड करावी. याशिवाय मान्यता नसलेले कोणतेही बियाणे पेरणी करू नये. यामुळे शेताचे तसेच पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पर्यावरण कायद्यानुसार अनधिकृत बियाण्यांचा वापर, साठवणूक हा कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. यासाठी एक लाकांचा दंड व पाच वर्षे कारावासाची तरतूद असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

मान्यता नसलेले बनावट व बेकादेशीर एचटीबीटी बियाणे आरआर, राऊंड अप बीटी, तणावरची बीटी, विड गार्ड आदी नावाने विक्री होण्याची शक्यता आहे. असे बियाणे अधिकृत नसून अशा बियाण्यांचे उत्पादन व विक्री करण्यास शासनाची अनुमती नसल्याचे जिल्हा अधीषक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले. अशा प्रकारच्या बियाण्यांची विक्री केल्यानंतर पावती दिली जात नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे, याचा उल्लेख नसतो. पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिलेले नसल्याचे चवाळे यांनी सांगितले.

अशा बियाण्यांची विक्री किंवा साठवणूक केल्यास बियाणे नियंत्रण आदेश १९८३ महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम २००९, नियम २,०१० तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १,९८६ अंतर्गत कायदेशीर कारवाई केल्या जाणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

बॉक्स

बोलगार्ड-२ मध्ये उपलब्ध बीजी-२ ची किंमत ७३० रुपये

कपाशीचे बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, बिलात पीकाचे वाण, लॉट नंबर, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे पूर्ण नाव नमूद असल्याची खात्री करून घ्यावी. कपाशी बियाणे पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासून घ्यावे. बियाणे उगवणीची खात्री करण्यासाठी अंतिम मुदत तपासावी. बोलगार्ड-२ मध्ये बीजी-२ च्या पाकिटाची किंमत ७३० रुपये यंदा जाहीर करण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले.