शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

उपजिल्हा रुग्णालयांमध्ये औषधी विभागाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST

गोपाल डाहाके फोटो पी १७ मोर्शी फोल्डर मोर्शी : येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये औषधनिर्माण अधिकाऱ्यांच्या ३ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ...

गोपाल डाहाके

फोटो पी १७ मोर्शी फोल्डर

मोर्शी : येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये औषधनिर्माण अधिकाऱ्यांच्या ३ जागा मंजूर आहेत. त्यापैकी २ भरलेल्या आहेत. परंतु एक कर्मचारी २ वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जीला डेप्युटेशनवर असल्याने येथील एकाच औषधनिर्माण अधिकाऱ्यावर भार पडत आहे. यामुळे औषध वाटपामध्ये अनियमितता येत आहे तसेच सहाय्यक आरोग्य अधीक्षक मंजूर एक पद हेसुद्धा जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथे डेप्युटेशनवर असल्यामुळे हे पद रिक्त आहे. या रुग्णालयात एकूण ४७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३६ पदे भरलेली असून, ११ पदे रिक्त आहेत. उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण दोन वार्ड आहेत. यामध्ये ५० बेडची व्यवस्था असून, दररोज १०० ते १२० रुग्ण ओपीडीमध्ये येतात. मात्र, सध्या या ठिकाणी भरती असलेल्या रुग्णांची संख्या फार कमी आहे, असे मनीष अग्रवाल, कनिष्ठ लिपिक, उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी यांनी सांगितले. तसेच रुग्णालयाच्या आवारात जागोजागी घाण असल्याने साफसफाई करण्याची गरज आहे.

तालुक्यामध्ये एकूण १०४ गावे असून, २०११मध्ये झालेल्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४५ हजार १५१ एवढी असून, तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पाच आहेत. यामध्ये अंबाडा नेरपिंगळाई हिवरखेड विचोरी खेड या केंद्राशी संलग्नित असलेली उपकेंद्रे २१ आहेत. पैकी अंबाडाअंतर्गत अंबाडा (अ) खानापूर पिंपरी पिंपळखुटा मोठा निंभी हिवरखेडअंतर्गत हिवरखेड (अ व ब) पाळा खेडअंतर्गत रिद्धपूर (अ व ब) ब्राह्मणवाडा दिवे तरोडा उदखेड नेरपिंगळाईअंतर्गत राजुवाडी शिरखेड नेरपिंगळाई विचोरीअंतर्गत आडगाव शिरजगाव धामणगाव रोहनखेड दाभेरी अशी उपकेंद्रे आहेत.

तालुका आरोग्य विभागातील कर्मचारी संख्येमध्ये विस्तार अधिकारी आरोग्य मंजूर पदे २. रिक्त पदे २. आरोग्य सहाय्यक पुरुष मंजूर पदे ८. कार्यरत ७. अंबाडा रिक्त १. आरोग्य सहाय्यक महिला ७ पदे मंजूर. कार्यरत ७. आरोग्यसेवक पुरूष १४ मंजूर. १३ कार्यरत, १ रिक्त. पाळा उपकेंद्रांमध्ये आरोग्यसेविका महिला मंजूर पदे २८. पैकी १३ कार्यरत. १५ पदे रिक्त. औषधनिर्माण अधिकारी मंजूर पदे ८. कार्यरत ४, रिक्त ४. सफाई कर्मचारी मंजूर पदे ५. पैकी कार्यरत ३, रिक्त २ तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदावर ८ महिला आरोग्यसेविका असून, आरोग्य सहाय्यक १ स्टाफनर्स २, समुदाय आरोग्य अधिकारी १८ अशा प्रकारे तालुका आरोग्य विभागामध्ये कर्मचारी संख्या आहे. परंतु तालुका आरोग्य विभागाला स्वतःची जागा नाही. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सांभाळणारे कार्यालय मात्र २०० स्क्वेअर फूटमध्ये आहे, अशी माहिती कनिष्ठ सहाय्यक सारंग नारिंगे यांनी दिली.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये पुरेसा औषधपुरवठा आहे. परंतु काही प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये पदे रिक्त आहेत.

डॉ. महेश जैस्वाल

तालुका आरोग्य अधिकारी, मोर्शी