शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर शहरात डासांचा उपद्रव वाढला

By admin | Updated: April 8, 2015 00:36 IST

एकीकडे ऊन तापू लागली आहे तर दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सकाळी व सायंकाळी प्रत्येक घराघरांत डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

आरोग्याला धोका : नगरपालिकेकडे फॉगिंग मशीन नाहीसंदीप मानकर  दर्यापूरएकीकडे ऊन तापू लागली आहे तर दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सकाळी व सायंकाळी प्रत्येक घराघरांत डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकेकडे फॉगिंग मशीन धुरळणी करण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे नाल्यांमध्ये धुरळणी झाली नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सांडपाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. सध्या डेंग्यू सदृष्य तापाची लागण कुणालाही झाली नसल्याचे कळते. परंतु गतवर्षी या तालुक्यात याच आजाराने अनेकांचे बळी गेले होते. दर्यापूर नगर पालिकेकडे २० वार्ड व पाच प्रभाग आहेत. संपूर्ण शहराच्या आरोग्याची जबाबदारी एक आरोग्य निरीक्षक, एक जमादार, नऊ वॉर्ड शिपाई, ४६ सफाई कामगार व ३० कंत्राटी कामगार यांच्या खांद्यावर आहे. परंतु एवढ्या मोठ्या शहरात स्वच्छता करण्यात हा स्टॉप अपुरा पडत असल्याची नेहमीच ओरड होते. नगर पालिकेच्या बैठकीत चार फाँगीग मशीन नव्याने विकत घेण्याचा ठराव यापुर्वीच मांडण्यात आला असून फॉगिंग मशीनसाठी टेंडर प्रोसेसही झाली आहे. नगरपालिकेकडे एक फॉगिंग मशीन उपलब्ध आहे. परंतु ही मशिन अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने धुरळणी करावी असे आदेश मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी आरोग्य निरीक्षक शिवाजी गोमासे यांना दिले आहेत. स्वच्छ व सुंदर दर्यापूर हे नगर पालिकेचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने २० ही नगरसेवक आपल्या वार्डातल्या समस्या व स्वच्छता यासाठी पुढाकार घेत असतात. त्यांचा नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तसा पाठपुरावाही असतो. परंतु मार्च एंडिगच्या गडबडीत आरोग्याच्या समस्या संदर्भात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शहरात अनधिकृत वराहांचे प्रमाणही वाढले आहे. वराह पकडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने या संवेदनशील मुद्याकडे दुर्लक्ष होते. मटण मार्केटसाठी दर्यापूर नगर पालिकेच्या विशेष निधीतून आठवडी बाजारात मार्केट बांधण्यात आले आहे. परंतु हे मार्केट पांढरा हत्ती ठरले असून अद्याप अधिकृतपणे ते सुरु झाले नसल्याचे कळते. त्यामुळे आठवडी बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून उघडयावरच मांस विक्री सुरु केली आहे. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना यासंदर्भाचा त्रास सहन करावा लागतो. या मार्गाने विद्यार्थ्यांची नेहमीच ये-जा असते. त्यामुळे त्यांच्या मनावर उघड्यावर मांस विक्रीचा परिणाम होतो. नगरपालिकेने यासंदर्भाची अनेकवेळा धडक मोहीम राबवून कारवाईसुध्दा केली. परंतु कारवाईला न जुमानता पुन्हा उघड्यावर मांस विक्री सुरु झाली आहे. शहरात नगर पालीकेच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम झपाट्याने सुरु आहे. या कामाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. रस्ता दुभाजकाचेसुध्दा सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुरळणी करण्यासाठी सांगितले आहे. प्रत्येकच वार्डात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी केमिकलसुध्दा मागविण्यात आले असून आपण स्वत: जातीने लक्ष देऊन हे काम पूर्ण करुन घेऊशिवाजी गोमासे, आरोग्य निरीक्षक दर्यापूर