शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या नाकर्तेपणानेच समस्या चिघळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:45 IST

खुद्द मुख्यमंत्रीच सूत्रे हलवित असताना जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ज्यांची पालकत्वाची जबाबदारी आहे, ते प्रवीण पोटे पाटील जिल्ह्यात असतानासुद्धा आदिवासी प्रकल्पग्रस्तांना भेटले नाहीत. त्यांच्या नाकर्तेपणानेच ही समस्या चिघळली.

ठळक मुद्देरवि राणा : वनपट्ट्यांऐवजी महसूल जमीन अन् प्रत्येक सज्ञानाला १० लाख, प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खुद्द मुख्यमंत्रीच सूत्रे हलवित असताना जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ज्यांची पालकत्वाची जबाबदारी आहे, ते प्रवीण पोटे पाटील जिल्ह्यात असतानासुद्धा आदिवासी प्रकल्पग्रस्तांना भेटले नाहीत. त्यांच्या नाकर्तेपणानेच ही समस्या चिघळली. अखेर मुख्यमंत्र्यांनी फोन करून काम फत्ते करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बुधवारी मध्यरात्रीनंतर आम्ही आदिवासींना स्थलांतरित केले, अशी माहिती आ. रवि राणा यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच ऐतिहासिक निर्णय घेतला. व्याघ्र प्रकल्पात ज्या आदिवासी प्रकल्पग्रस्तांचे वनजमिनीचे पट्टे होते, त्या बदल्यात आता महसूल विभागाची जमीन त्यांना देण्यात येणार आहे. याविषयी लवकरच शासननिर्णय जारी होणार आहे. प्रकल्पग्रस्तांची इच्छा अमरावती जिल्ह्यातच राहण्याची असल्याने त्यांना चिखलदरा व धारणी तालुक्यात या जमिनी देण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाºयांची लवकरच बैठक होईल. याव्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त कुटुंबातील १८ वर्षांवरील सदस्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील. या प्रमुख दोन मागण्यांसह अन्य मागण्यांवरदेखील सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. प्रशासनाने १५ बसगाड्यांची व्यवस्था केली होती. आदिवासी प्रकल्पग्रस्त १५ दिवसांपासून पुन्हा संरक्षित क्षेत्रात परतले असल्याची बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दडवून ठेवली होती, अशीही माहिती राणा यांनी दिली. माहिती मिळताच आदिवासींच्या न्यायासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी व अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह सीसीएफ, डीएफओ, एसडीओ, तहसीलदार आदींची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती, अशी माहिती राणा यांनी दिली.यासंबंधाने पालकमंत्र्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रियेसाठी नकार दिला. खासदारांचा संपर्क होऊ शकला नाही.खासदारांचा शोध सुरूराणा म्हणाले, १५ दिवसांपासून जिवावर उदार होऊन आदिवासी जंगलात आंदोलन करीत आहेत. या बांधवांनी खासदारांना भरभरून मते दिलीत. त्यांना मात्र या प्रकल्पग्रस्तांची भेटही घ्यावीशी वाटली नाही. खासदारांचा शोध सुरू आहे. पालकमंत्र्यांनाही शोधले पाहिजे. या मंडळींनी जराही संवेदनशीलता शिल्लक असेल, तर निदान आता तरी प्रकल्यग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवावे.पटेलांचा अप्रत्यक्ष सहभागचराजकुमार पटेल यांच्याशी मुख्यमंत्र्यांचा संवाद झाला. माझ्याशी व जिल्हाधिकाºयांशीदेखील त्यांचा संवाद अन् चर्चा झाली. न्यायालयीन प्रकरणामुळे त्यांनी चर्चेत प्रत्यक्ष सहभाग टाळला असल्याचे आ. राणा यांनी सांगितले. पटेलांनी या प्रकरणात शासनाला सहकार्यच केले आहे. पालकमंत्री व खासदारांकडून जे सहकार्य अपेक्षित होते, ते झाले नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाजिल्हाधिकाऱ्यांची कमालीची चिकाटीजिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी या प्रकरणात कमालीची चिकाटी दाखविली. अत्यंत संयम, पोटतिडीक व सकारात्मकपणे त्यांनी हे प्रकरण हाताळले. शासनासोबत सात्यत्याने पाठपुरावा केला. आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात तोडगा निघावा व ते जंगलातून सुखरूप जावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न झालेत. रात्री २ वाजताही ते आदिवासींशी संवाद साधत होते, अशी माहिती आ.राणा यांनी दिली.