शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

झुकलेल्या विद्युत खांबामुळे अपघाताची शक्यता

By admin | Updated: August 20, 2016 00:10 IST

तिवसा तालुक्यातील सुलतानपूर नमस्कारी मार्गावरी ३ विद्युत पोल (खांब) झुकलेले आहेत.

तिवसा वीज वितरणचे बेपर्वा धोरण : विद्युत खांब तातडीने उभे करण्याची मागणीतिवसा : तिवसा तालुक्यातील सुलतानपूर नमस्कारी मार्गावरी ३ विद्युत पोल (खांब) झुकलेले आहेत. त्यापैकी एक खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहे. एका काठीचे आधारावर हा विद्युत खांब असल्याने अपघाताला आमंत्रण देत आहे. तिवसा विद्युत कंपनी मात्र याबद्दल उदासीन असून कुंभकर्णी झोपेत असलेली विद्युत कंपनी नागरिकांचे जिवावर उठली आहे. तालुक्यातील सुलतान नमस्कारी या मार्गावर गावात विद्युत वाहन करणारे तीन खांब पार झुकले आहे. अगदी ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळीचे मार्गावरच रोडवर ते खांब झुकले आहे. एक खांब एका लाकडी काठीच्या आधारावर असून कोणत्याही क्षणी पोल पडल्यास जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने नागरिकांचा जीव जाऊ शकतो. तरीदेखील याला व्यवस्थित करण्याचे धाडस तिवसा वीज कंपनीने दाखवले असल्याने लोकांच्या जिवावर महावितरण उठली असून या मार्गावर नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. बेपर्वा असलेल्या वीज वितरण कंपनीला केव्हा जाग येईल, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अपघात झाल्यास वीज कंपनीच याला दोषी राहील. या झुकलेल्या खांबाला सरळ उभे करून लोकांचे प्राण वाचवण्याची मागणी ममदापूर ग्रामपंचायत सदस्य मुंकुद पुनसे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)