शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांच्या अस्मिता बनल्या तुरूंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:22 IST

बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

ठळक मुद्देयशवंत मनोहर : कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.मातोश्री विमलबाई देशमुख सभागृहात नवव्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कामगार नंदू नेतनवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर साहित्यिक उत्तम कांबळे, भालचंद्र कानगो, नरेशचंद्र ठाकरे उपस्थित होते.मनोहर म्हणाले, खोटारडेपणा, पोरकटपणा करणारे जर सत्तेत पुन्हा २०१९ निवडून आले तर ते फक्त आपल्या बौद्धिक दुर्बलतेमुळेच शक्य होईल. २०१९ हे तुमचे, माझे मृत्यू वर्ष ठरेल. बहुजनांना धार्मिक अस्मिता बाजुला सारून सत्तेसाठी एकत्र यावे लागेल. हेच या संमेलनाचे फलित असेल. २०१४ मध्ये त्यांची सत्ता येण्याचे कारण म्हणजे आम्ही बौद्धिक दृष्ट्या पांगळे झालो होतो. हे पांगळेपण त्यावेळी हा माझा नेता, ही माझी जात, हा माझा धर्म, हा माझा पक्ष या संकुचित अस्मितेमुळेच आले होते. ते आता पुन्हा होता कामा नये, यासाठी बहुजनांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक काशीनाथ बुºहाटे, संचालन प्रसेजित तेलन यांनी केले. आभार विजय रोडगे यांनी मानले.दलितांमधील मार्क्सवाद्यांबद्दलची तेढ अनाकलनीयमार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत दलितांच्या हिताची नेहमीच बाजू घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आंदोलनात, मोर्चात डाव्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. कम्युनिस्टांवरील खटले बाबासाहेब लढले. असा इतिहास असतानाही दलित आणि मार्क्सवादी यांच्या असलेली तेढ मात्र अनाकलनीय आहे, असे प्रतिपादन विचारवंत उद्धव कांबळे यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर ‘आंबेडकर आणि मार्क्स : नवे आकलन, नव्या दिशा’ या विषयावर उद्धव कांबळे यांचे विशेष व्याख्यान पार पडले. यावेळी अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे माजी संचालक, सिनेट सदस्य बी. आर. वाघमारे अध्यक्षस्थानी होते.