शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मनिर्भर भारता’साठी कृषी विकासाला प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:01 IST

कृषी शिक्षणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझ्या मनात प्रारंभापासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात शेतीचा एवढा अग्रक्रमाने विचार करणारे मंत्री आपल्याला लाभले, हे देशाचे भाग्य आहे. त्यांनी शेती विकासाचा प्राधान्याने विचार केला. त्यांच्या विचारांचे मूल्य मोठे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देश सर्वार्थाने आत्मनिर्भर होण्यासाठी कृषिक्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यास प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख यांचा शेती विकासाचा संकल्प कृतीत आणण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समर्पित भावनेने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्यपाल  कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले व्यासपीठावर होते.कृषी शिक्षणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझ्या मनात प्रारंभापासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात शेतीचा एवढा अग्रक्रमाने विचार करणारे मंत्री आपल्याला लाभले, हे देशाचे भाग्य आहे. त्यांनी शेती विकासाचा प्राधान्याने विचार केला. त्यांच्या विचारांचे मूल्य मोठे आहे. ज्या काळात देश दुष्काळाचा मुकाबला करत होता, त्या काळात कृषीविषयक कार्याला प्राधान्य देऊन पंजाबरावांनी शेती विकासासाठी निष्ठेने प्रयत्न केले, त्यातून देशात कृषी क्रांती घडून आली, असे कृतज्ञ उद्गार त्यांनी काढले.कृषिक्षेत्रात जिओ टॅगिंगसारखे होणारे नवे प्रयोग अत्यंत उपयुक्त आहेत, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांनी अविरत निष्ठेने केलेल्या कामगिरीमुळे देशाला उपासमारीचे संकट भेडसावण्याची वेळ आली नाही. माझी स्वत:ची बांधीलकी शेतीशी आहे. त्यामुळे शेतीविषयक संस्थांबाबत मला विशेष आस्था आहे, असे आवर्जून सांगून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पापळ या जन्मगावी कृषी महाविद्यालय सुरू होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. भाऊसाहेबांनी सुरू केलेली ही संस्था भविष्यात अधिक विकसित व व्यापक व्हावी तसेच शेती अध्ययनासाठी एक आदर्श प्रारूप ठरावी, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.     महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख.  संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन दिलीप इंगोले यांनी केले.

 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीnavneet kaur ranaनवनीत कौर राणा