शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या हस्ते करणार बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखान्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST

अमरावती: बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे निर्माणकार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी कोरोनाकाळात खासदार राणा यांनी ...

अमरावती: बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे निर्माणकार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी कोरोनाकाळात खासदार राणा यांनी अथक परिश्रम करून ८० कोटींचा निधी खेचून आणला. या कारखान्याचे निर्माणकार्य येत्या २०२२ मध्ये पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाईल, असा संकल्प खासदार नवनीत राणा यांनी सोडला. खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी वॅगन दुस्ती कारखाना निर्माणकार्याची पाहणी केली, हे विशेष.

वॅगन कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात असून उरलेली सर्व कामे कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी, अन्यथा कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्टेट’ करून त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिला.

बडनेरा जुना महामार्गवरून जाणाऱ्या अमरावती- बडनेरा रेल्वे लाईनवर खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या अथक प्रयत्नांनी जुनी वस्ती येथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग मंजूर झाला. यासाठी ३७ कोटींचा निधीसुद्धा प्राप्त झाला आहे. जुना कोंडेश्वर नाका ते चंद्रानगर असा हा चौपदरी उड्डाणपूल राहणार असून, याखालून भुयारी मार्गसुद्धा राहील. या निर्माणस्थळीदेखील खासदार नवनीत राणा यांनी विश्वकर्मा प्रतिमा पूजन करून या निर्माणकार्य निर्मितीला शुभेच्छा दिल्या. या उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा खासदार राणा यांनी केली.

यावेळी खासदार नवनीत रवि राणा यांच्यासमवेत डीपीएम भट्टाचार्य, स्टेशन मास्तर सिन्हा, आरपीएफ मानस, नरवाल, इवनाते, सुनील राणा, जितू दुधाने, अजय जयस्वाल, अयूब खान, विलास वाडेकर, प्रवीण सावळे, सोनू रुंगठा, रऊफ पटेल, नितीन बोरेकर, नानकराम नेभनाणी, अजमत खान, आफताब खान, नील निखार, पंकज शर्मा, हर्षल रेवणे, अवि काळे, नितीन अनासाने, पंकज रामेकर, मंगेश चव्हाण, नसिरुद्दीन, सचिन सोनोने, अजय बोबडे, राजेश सुंडे, राहुल मापले, अनिल शेळके, योगेश जयस्वाल, दीपक ताथोड आदी उपस्थित होते.