शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघात प्राथमिक शिक्षकांनीही केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST

कॅप्शन - यादीतील ८०, ८१ क्रमांकावरील नावे प्राथमिक शाळेच्या शिक्षकांची आहेत. ---- विधान परिषद संहितेचा भंग, शेकडो प्राथमिक शिक्षकांची ...

कॅप्शन - यादीतील ८०, ८१ क्रमांकावरील नावे प्राथमिक शाळेच्या शिक्षकांची आहेत.

----

विधान परिषद संहितेचा भंग, शेकडो प्राथमिक शिक्षकांची नावे मतदार यादीत

लोकमत एक्सक्लुसिव्ह

अनिल कडू

परतवाडा : मतदानाचा अधिकार नसतानाही अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मतदान करणाऱ्या अशा शिक्षकांची संख्या मोठी असल्यामुळे निवडणूक आयोग याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेते, हे बघणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूर बाजार, चिखलदरा या तालुक्यातील जिल्हा पारिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची नावे शिक्षक मतदार यादीत आहेत. त्यांच्या नावांसमोर ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा’ असे गावाच्या नावासह नमूद आहे. प्राथमिक शाळातील शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी करवून घेताना मुख्याध्यापकांची स्वाक्षरी मतदार नोंदणी अर्जावर घेतली आहे.

-------------------

काय म्हणतो नियम?

विधान परिषद निवडणूक संहितेनुसार, ज्या शाळांचा दर्जा माध्यमिक, उच्च माध्यमिक वा महाविद्यालयीन आहे, त्यांनाच मतदानाचा हक्क आहे. माध्यमिक शाळेचा दर्जा असलेल्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांनाही मतदानाचा हक्क आहे. तथापि, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील शिक्षकांची मतदार यादीत नोंदणी करणे वा त्यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्याला विधान परिषद निवडणूक संहितेत कुठेही अनुकूलता दर्शविण्यात आलेली नाही. त्यामुळे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षकांची शिक्षक मतदारसंघात नोंदणी केली कशी, असा प्रश्न उपस्थित होतो.

बाॅक्स

भारताच्या संविधानातही उल्लेख

भारताचे संविधान कलम १७१ (३) (ग) नुसार, विधान परिषदेची रचना या शीर्षकाखाली, माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा खालचा दर्जा नसलेल्या, त्या राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये अध्यापनाच्या कामात निदान तीन वर्षे असलेल्या व्यक्तींनी बनविलेल्या मतदार गणांकडून निवडून दिले जातील, असा उल्ल्लेख आहे.

-------------

कोट

माध्यमिक शाळेचा दर्जा प्राप्त असलेल्या शाळातील शिक्षकांनाच मतदानाचा अधिकार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी होऊ शकत नाही. त्यांना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा अधिकारही नाही.

- दिलीप कडू, अध्यक्ष, राज्य शिक्षक संघ

--------------

कोट

मतदार नोंदणीचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले. आम्ही आमच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेतली. मतदार यादीत नाव आले, म्हणून मतदान केले.

-एम.बी. हिवे, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख

--------------------

१९८५ साली महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या माध्यमिक दर्जाच्या शाळांमधील तीन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा हक्क आहे. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार नाही.

- विवेक काळकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, अमरावती.