शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

शार्दुलचे मॉडेल देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:17 IST

वाहतूक घनतेचा प्रश्न सोडविणारे शार्दुलचे मॉडेल रस्त्यावरील प्रदूषण व वाहनाचे इंधन या दोन्ही बाबींपासून होणारा त्रास वाचविणारे आहे. राज्य विज्ञान प्रदर्शनातून त्याचे मॉडेल देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी नीलिमा टाके : विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केला सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : वाहतूक घनतेचा प्रश्न सोडविणारे शार्दुलचे मॉडेल रस्त्यावरील प्रदूषण व वाहनाचे इंधन या दोन्ही बाबींपासून होणारा त्रास वाचविणारे आहे. राज्य विज्ञान प्रदर्शनातून त्याचे मॉडेल देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी व्यक्त केले.धामणगाव रेल्वे येथील से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता सातवीतील शार्दुल मोहन राऊत या विद्यार्थ्याने शिक्षक राम बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आॅटोमॅटिक ट्राफीक कंट्रोल हे रस्त्यावरील वाहतूक घनतेवर उपाय सांगणारे मॉडेल तयार केले. चाळीसगाव येथील राज्य विज्ञान प्रदर्शनात त्याच्या मॉडेलने अव्वल क्रमांक घेतला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच शिक्षणाधिकाऱ्यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालक, शिक्षक व त्याचा सत्कार केला़ देशात वाहतुकीचे महत्त्व सर्वाधिक आहे. आगामी काळात ट्राफीक सिग्नलवर वाहतुक सुरळीत व्हावी, देशाच्या अर्थकारणाला त्याचा लाभ व्हावा म्हणून शार्दुल राऊत याने तयार केलेले मॉडेल देशात अव्वल ठरेल, असा विश्वास टाके यांनी व्यक्त केला़ शार्दुल राऊतचे पालक मोहन राऊत, मीनाक्षी राऊत यांचा त्यांनी सत्कार केला़ यावेळी विज्ञान पाठ्यपुस्तक निर्मिती व राज्य निर्धारक शाळा सिद्धीचे सदस्य गजानन मानकर, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण समन्वयक व्यावसायिक विकास संस्थेचे समन्वयक श्रीनाथ वानखडे, राम बावस्कर, अनूप अग्रवाल यांची उपस्थिती होती़ शिक्षक राम बावस्कर यांचाही सत्कार करण्यात आला़ सेफलाचे प्राचार्य गणेश चांडक, उपप्राचार्य मनोज हांडे, गोपाल मुंधडा, मनोहर, अजय जिरापुरे यांचीही उपस्थिती होती़