शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम सदस्यांचे दबावतंत्र

By admin | Updated: September 3, 2014 22:59 IST

येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे.

महापौरपदाची निवडणूक : शेख जफर यांना उपमहापौरपदाची दुसऱ्यांदा संधीअमरावती : येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. महापालिकेतील सर्वपक्षीय मुस्लिम सदस्यांनी दबावतंत्र निर्माण करुन शेख जफर शेख जब्बार यांच्या नावावर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून शिक्कामोर्तब करुन घेतले. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीचे चित्र पालटणार आहे.महापालिकेत ८७ सदस्य संख्या असून महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ४४ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यानुसार काँग्रेसकडे ३० तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटकडे २३ सदस्य आहेत. आघाडीत एकूण ५३ सदस्य असून या संख्याबळाच्या आधारावर ही निवडणूक अविरोध होऊ शकते. मात्र राष्ट्रवादी काँगेस फ्रंटमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाचेही परिणाम महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. गटनेता अविनाश मार्डीकर की, सुनील काळे यावर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूने दाखलप्रकरणी ५ सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रवादीच्या गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांना कायम ठेवण्याचा निकाल यापूर्वीच दिला. निकालाला आव्हान व राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांची काँग्रेसवर कुरघोडीमहापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत संजय खोडके गटाला बाजूला ठेवून काँग्रेसने राष्ट्रवादीच्या सदस्यांना सोबत घेत सत्तेची समीकरणे जुळवून आणावीत, याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसचे नेते आ. रावसाहेब शेखावत यांच्यावर दबाव आणू शकतात, अशी चर्चा महापालिका वर्तुळात जोर धरु लागली आहे. आघाडी धर्मानुसार खोडके नव्हे, तर राष्ट्रवादीशी मैत्री करुन महापालिकेत सत्ता स्थापन व्हावी, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काँग्रेसवर दबाव आल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.