शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ‘सीईओ’ करणार सादर

By admin | Updated: February 17, 2017 00:26 IST

जिल्हा परिषदेत नवीन शिलेदार १५ मार्चपूर्वी येणार असले तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २१ मार्चला

शासनाचा निर्णय : नव्या पदाधिकाऱ्यांना ‘अंतिम’चा अधिकारअमरावती : जिल्हा परिषदेत नवीन शिलेदार १५ मार्चपूर्वी येणार असले तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २१ मार्चला संपणार असल्यामुळे अंदाजपत्रक सादर करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर शासनाने एक परिपत्रक काढून जिल्हा परिषदेला १५ मार्चला अंदाजपत्रक सादर करावे, त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी ते अंतिम करावे अशी सूचना दिली आहे.जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितींसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यानंतर नूतन सदस्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. पण, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २१ मार्च रोजी संपत असल्यामुळे महिनाभर नवीन पदाधिकाऱ्यांना थांबावे लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक २७ मार्चपूर्वी सादर करावे लागणार आहे. यामुळे अंदाजपत्रक सादर करण्यावरून आजी-माजी सदस्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना तो सादर करण्याची सूचना दिली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी १५ मार्चपूर्वी अंदाजपत्रक सादर करणार आहेत. त्याआधी २५ फेब्रुवारीपूर्वी १४ पंचायत समितींचे अंदाजपत्रक संबंधित गटविकास अधिकारी सादर करणार आहेत. तेच अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर जिल्ह्य़ाचे एकत्रित अंदाजपत्रक सादर होईल. यानंतर नवीन पदाधिकारी या अंदाजपत्रकास अंतिम मंजुरी देणार आहेत.