शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४११ गावांचा स्वच्छता आराखडा तयार

By admin | Updated: June 20, 2016 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४११ गावांच्या स्वच्छताविषयक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

उपक्रम : जिल्हा परिषदेच्या पाणी, स्वच्छता मिशनचा पुढाकारअमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४११ गावांच्या स्वच्छताविषयक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याच्या माध्यमातून संबंधित गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार आतापर्यंत ५० गावांचा कृती आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे लोकसहभागातून स्वच्छतेच्या कामांना गती दिली जात आहे. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील चवदाही तालुक्यांतील ४११ गावांमध्ये स्वच्छतेसह हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यात निवडण्यात आलेल्या गावांत जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन आणि संबंधित पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रबोधन सुरू केले आहे. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. जुलैअखेरपर्यंत सर्वच गावांचा आराखडा तयार करण्यात येऊन ग्रामस्थांना स्वच्छतेसाठी प्रेरित केले जाणार आहे. यासाठी संबंधित गावांचे सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिकांची मदत घेतली जात आहे. गावातील भौगोलिक स्थितीचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)प्रत्येकांवर जबाबदारीकृती आराखड्यानुसार गावात कोणती कामे करायची, हे निश्चित केले जाते. शिवाय गावाची लोकसंख्या व कुटुंबसंख्या गृहित धरली जाते. त्यामुळे स्वच्छतेच्या कामाची गती कशी असावी, याची कल्पना येते. शिवाय प्रत्यक्षात स्वच्छतेला कुठून सुरुवात करायची यावर चर्चा होईल. गावातील प्रत्येक घटकावर स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागात या मोहिमेला बळ मिळणार आहे.