शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांत मुनादी; कोरोना समित्या झाल्या ॲक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:13 IST

धामणगाव रेल्वे : जिल्ह्यात तिसरा क्रमांकाचे सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या धामणगाव तालुक्यात असताना ...

धामणगाव रेल्वे : जिल्ह्यात तिसरा क्रमांकाचे सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या धामणगाव तालुक्यात असताना शासनाच्या त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांवर आता थेट पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे. दरम्यान कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी गावागावांत मुनादी देण्यात आली असून, कोरोना समित्या ॲक्टिव्ह झाल्या आहेत.

तालुक्यात कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वेग धरत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात ही संख्या ७० टक्‍क्‍यांनी अधिक आहे. शहरात सकाळी ११ नंतर निर्बंध पाळले जात असले तरी ग्रामीण भागात एकाच कट्ट्यावर बसणे, किराणा दुकान, पान टपरी सुरू ठेवणे, मास्क न लावणे असे प्रकार घडत आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात ३० ते ५३ वयोगटातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने रविवार ९ मेपासून सात दिवसांकरिता कडक निर्बंध लावले आहेत. तहसीलदार गौरवकुमार भळगाठीया व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी सर्व तालुका नियंत्रण समिती व गावागावांतील कोरोना समितीला अधिक जागृत राहण्याचे निर्देश दिले आहेत.

गावात वाढणाऱ्या कोरोना

रुग्णांची संख्या पाहता दररोज चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळल्यास तात्काळ माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांना माहिती द्यावी लागणार आहे. गावागावांत गठित समितीतील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, जि. प. शाळेतील शिक्षक यांनी या कडक निर्बंध काळात अधिक सतर्क राहून गावात याचे पालन व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठी गावागावांत मुनादी देण्यात आली आहे.

कोट

कोरोनाच्या त्रिसूत्रीचे सूचनेचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कोरोना समित्यांना देण्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. शहर किंवा ग्रामीण भागात विनाकारण फिरताना दिसल्यास त्यावर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

- जितेंद्र जाधव,

उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदूर रेल्वे