शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वादळासह मान्सूनपूर्व पावसाचा शहराला तडाखा, झाडे उन्मळली, टिनपत्रे उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:11 IST

अमरावती : तौते वादळामुळे झालेला हवामान शास्त्रीय बदलात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने शहराला चांगलाच तडाखा दिला. अनेक भागांतील ...

अमरावती : तौते वादळामुळे झालेला हवामान शास्त्रीय बदलात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने शहराला चांगलाच तडाखा दिला. अनेक भागांतील वृक्ष उन्मळून पडली. त्याखाली कार दबली, काही भागातील टिनपत्रे उडाली, जाहिरातीचे फलके पडलीत, झाडांच्या फांद्यामुळे विद्युत तारा तुटल्या. अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळपर्यत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

शहरात दुपारी १ पासून सुमारे ४५ मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपूरी कॅम्प भागात हिच स्थिती दिसून आली. याशिवाय सायन्सकोर शाळेचे टिनपत्रे उडाली, विभागीय क्रीडा संकुलातील झाडांच्या फांद्या तुटल्या अन् शेडचे टिन वाकले आहेत. रामपुरी कॅंम्प येथे रोहित्र पडले आहे.याशिवाय झाडही वीज वाहिनीवर पडले आहे. पलास लाईन गाडगेनगर येथेही वीज वाहिनीवर झाड पडून वीज वाहिनी तुटली आहे. याशिवाय शहरातल्या अनेक भागात झाडांच्या फांद्या तुटल्याने दिसून आले. सायंकाली उशीरापर्यत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

अचानक आलेल्या वादळासह पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली तर बच्चे कंपनींनी पावसाचा आनंद लुटला. संचारबंदी सुरु असल्याने रस्त्यांवर तुरळक वाहन असल्याने कुठलेच नुकसान झाले नसल्याचे दिसून आले.

बॉक्स

पहिल्याच पावसात महावितरणची पोलखोल

दुपारी अचानक झालेल्या वादळामुळे महावितरण यंत्रणा विस्कळीत होऊन काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्याचबरोबर ११ केव्ही राजकमल, ११ केव्ही एल.आय.सी.११ केव्ही श्रीकृष्ण पेठ आणि ११ केव्ही मोरबाग या ३३ केव्ही पॉवर हाऊस याशिवाय २२० केव्ही अमरावती या उच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वडाली,११ केव्ही बडनेरा,११ केव्ही टाऊन ३ आणि ११ केव्ही लक्षमीनगर या वीज वाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू झालेला नव्हता.

बॉक्स

२२ पर्यंत ढगाळ वातावरण राहणार कायम

अरबी समुद्रातील चक्रीवादळ तसेच विदर्भावर असलेले चक्राकार वारे आणि अन्य हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात पुढील पाच दिवस कमी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे. १९ मे पर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण २२ तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात विशेष बदल नसल्याची माहिती हवामातज्ञ अनिल बंड यांनी दिली.