शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

येथील उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने १३ ऑगस्ट २०२१ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाच्या स्थगितीने बँकेच्या निवडणुकीवर विरजण पडले आहे. ३१ ऑगस्टपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया आरंभली जाणार होती, अशी माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीला दोन आठवड्यांची स्थगिती देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिला. त्यामुळे बँक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे चार दिवस असताना न्यायालयाच्या स्थगितीने ग्रहण तर लागले नाही, अशी चर्चा होत आहे. येथील उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने १३ ऑगस्ट २०२१ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाच्या स्थगितीने बँकेच्या निवडणुकीवर विरजण पडले आहे. ३१ ऑगस्टपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया आरंभली जाणार होती, अशी माहिती आहे. आता उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने दाेन आठवडे ‘वेट ॲन्ड वॉच‘ असणार आहे. केंद्र शासनाने २०१३ मध्ये ९७ व्या घटना दुरुस्तीप्रमाणे सहकार क्षेत्रासाठी ‘मॉडेल बॉयलॉज’ तयार करताना सहकार संस्थांमध्ये २१ पेक्षा जास्त संचालक असू शकत नाही, असा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात त्यावेळी गुजरातमधील राजेश शाह यांनी  उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुजरात उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे सहकारासाठीचे हे ‘मॉडेल बॉयलॉज’ चे संशोधन करावे, असे आदेश दिले होते. त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक असेलेले नितीन हिवसे यांनी अहमदाबाद येथे जाऊन राजेश शाह यांची भेट घेतली आणि याप्रकरणाची माहिती जाणून घेतली होती. याच आधारे मुंबई उच्च न्यायालयात २०१५ मध्ये  याचिका दाखल केली. या निर्णयावर स्थगनादेश देताना संचालक मंडळ २१ करण्याची आवश्यता नाही, असे स्पष्ट केले. असे असताना जिल्हा उपनिबंधकांनी कलम १४(२) नुसार बॅंकेला नाेटीस न बजावता २३ संचालकांचा प्रस्ताव रद्द केला, असे नितीन हिवसे यांचे म्हणने आहे. उपनिबंधकांनी केलेल्या असंवैधानिक कारभाराविरोधात जयसिंग देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ३१९३/२०२१ अन्वये दाद मागितली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती एन.बी. सूर्यंवंशी यांनी दोन आठवड्यापर्यंत बॅंक निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी उच्च न्यायालय कोणता निर्णय घेतील, याकडे सहकार क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष लागले आहे.

उच्च न्यायालयाने कशाच्या आधारे स्थगिती दिली, याबाबत कल्पना नाही. मात्र, बँकेची निवडणूक लवकर  व्हावी आणि लोकहिताचा कारभार सुरू व्हावा, अशी अपेक्षा आहे. २१ किंवा २३ संचालक मंडळ असो कशाही प्रकारे निवडणूक झाली तरी ती मान्य राहील. बँकेचा कारभार प्रशासकांकडे योग्य नाही. - बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस 

उच्च न्यायालयाचा जो काही निर्णय येईल तो मान्य असेल. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. जवळपास उमेदवारही निश्चित झाले आहेत. स्थगितीमुळे पुन्हा मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास काही दिवस मिळणार आहे. - संजय खोडके, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस

मतदारसंघाची संख्या कमी करणे ही बाब असंवैधानिक आहे. जिल्हा उपनिबंधकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. २३ वरून २१ सहकारी बँकेत संचालक संख्या करणे, हे नियमबाह्य आहे. याविरूद्ध उच्च न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली आहे. - नितीन हिवसे, माजी संचालक, जिल्हा सहकारी बँक

 

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक