शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कापणीपश्चात सोयाबीनचे नुकसान; १७ हजार तक्रारी, ११ हजार प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 10:59 IST

Amravati : अतिवृष्टीने सोयाबीन भिजले; गंजींमध्ये पाणी शिरल्याने ओढवले संकट

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : परतीच्या पावसाने काढणीवर आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय फुटलेला कापूस भिजला व खराब झाला. त्यामुळे बाधित पिकांचे पंचनामे करून परतावा मिळावा, यासाठी पीक विमा कंपनीकडे १७,४७६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. कंपनीद्वारा आतापर्यंत ११ हजार पूर्वसूचनांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.

पीक कापणीपश्चात पावसाने नुकसान झाल्यास परतावा मिळण्याची तरतूद पीक विम्यामध्ये आहे. यासाठी पीक नुकसानीचे ७२ तासांच्या आत संबंधित पीक विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे याची पूर्वसूचना द्यावी लागते. शुक्रवारी परतीच्या पावसाने सोंगणी व मळणी झालेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय गंजी भिजल्या. या सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता आहे मागच्या हंगामापासून फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना सहभाग घेता येत असल्याने यावर्षी उच्चांकी म्हणजेच ५.१० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असल्याने एक लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. आता अतिवृष्टीने पुन्हा कापणीपश्चात नुकसान झाल्याने १७ हजारांवर शेतकऱ्यांनी कंपनीकडे परताव्यासाठी अर्ज केले आहेत. 

कंपनीकडे दाखल तालुकानिहाय तक्रारी अचलपूर ८८८, अमरावती १,३०९, अंजनगाव सुर्जी १,७७६, भातकुली १,०२५, चांदूर रेल्वे १,१५१, चांदूरबाजार ९७७, चिखलदरा ७१, दर्यापूर १,०३३, धामणगाव रेल्वे ७५०, धारणी २२९, मोर्शी १,४३३, नांदगाव खंडेश्वर ६,२९१, तिवसा ३३७, वरुड २०६ अशा एकूण १७,४७६ शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना पीकविमा कंपन्यांकडे दाखल केल्या आहेत.

टॅग्स :SoybeanसोयाबीनfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती