शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ऊरुसातील दुकानाचा वाद चिघळण्याची शक्यता

By admin | Updated: January 5, 2016 00:19 IST

दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात ऊरुसानिमित्त (यात्रा) लागलेल्या दुकानाच्या रात्रीच्या वेळेबाबत पोलीस, दुकानदार आणि काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांमध्ये ...

पोलीस कायद्यावर ठाम : रात्री १२ पर्यंत दुकाने उघडे ठेवण्याची मागणीअचलपूर : दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात ऊरुसानिमित्त (यात्रा) लागलेल्या दुकानाच्या रात्रीच्या वेळेबाबत पोलीस, दुकानदार आणि काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. दुकानदार आणि नेते दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी मागणी करीत आहे. प्रसंगी आक्रमक होतांना दिसत आहे. तर पोलिस शांतता अबादित राहण्याचे कारण देत शॉप अ‍ॅक्टच्या कायद्यावर ठाम आहेत. अचलपूूर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख आहे. येथे अनेक पौराणिक आणि पारंपरिक प्रथा अजूनही कायम आहेत हे शहर यांत्राचेही म्हणून ओळखले जाते. सर्वात मोठी व एक ते सव्वा महिना चालणारी ऊरूस (यात्रा) दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात असते. ऊरुस निमित्त वेगवेगळी दुकाने लागतात. २४ डिसेंबरपासून ऊरुसाला सुरुवात झाली आहे. येथे लागलेल्या दुकानांचे भाडे घेतले जाते काय किंवा कोण घेतो हे कुणीही ठामपणे सांगण्यासाठी समोर येत नाही. मात्र पहेलवान को पैसे दिया और रातभर दुकाने शुरू रखने की गॅरंटी उसने ली थी, असे काही दुकानदार दबक्या आवाजात सांगतात. यावर्षी पोलिसांनी शॉप अ‍ॅक्टचे वेळेनुसार रात्री १० वाजता दुकाने बंद झालीच पाहिजे. यासाठी चाप ओढला आहे. ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या आदेशाचे पोलीस कर्मचारी काटेकोर पालन करताना दिसतात. पण या आदेशाने दुकानदार हैरान झाले आहेत. यासाठी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मो. अजर शेख यांनी पोलीस स्टेशन व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. रात्री १० वाजेनंतर पोलिस दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचे दुकानदार व पोलिसात अनेकदा वाद होतात. त्यामुळे दुकानांभोवती जमाव जमा होऊन तणाव निर्माण होतांना दिसतो. पोलिस कारवाईवर ठाम आहेत. रविवारी ११ वाजता एका उपाहारगृह रात्री ११ वाजता पोलिसांनी बंद करायला सांगितले असता होटलचे संचालक मो. रिजवान,मो. इरफान हे दोघे भाऊ साथीदार इकबाल (परतवाडा) हे उपनिरीक्षक एस. के. फरकाडे यांचे अंगावर धावून गेले होते. त्यामुळे काही काळ तनावही निर्माण झाला होता. ११ आॅगस्ट रोजी अमित हत्याकांड झाल्यानंतर ठाणेदार चक्षूपाल बहादुरे ह्यांची तडकाफडकी बदली करण्यात येऊन त्यांची जागी नरेंद्र ठाकरे आले. त्यांनी तेव्हापासून रात्री १० वाजेनंतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश फर्मावला. त्यामुळे रात्री ११ वाजेनंतर शहरात सामसूम होत आहे. तोच आदेश ऊरुसात कायम ठेवला आहे.