शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मतदान, मतमोजणीमध्ये ११ मतांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:14 IST

लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान व आरओंनी आयोगाला पाठविलेला अहवाल त्यानंतर झालेली मतमोजणी यामध्ये ११ मतांचा घोळ झालेला आहे. आयोगाने नंतर दिलेल्या लिंकनंतर जिल्हा निवडणूक विभागाने हा घोळ निस्तरला असला तरी याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केव्हा, असा मतदारांचा सवाल आहे.

ठळक मुद्देअमरावती लोकसभा क्षेत्र : मतदानाची आकडेवारी पाच मतदारसंघात कमी-अधिक, नंतर जुळविले आकडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान व आरओंनी आयोगाला पाठविलेला अहवाल त्यानंतर झालेली मतमोजणी यामध्ये ११ मतांचा घोळ झालेला आहे. आयोगाने नंतर दिलेल्या लिंकनंतर जिल्हा निवडणूक विभागाने हा घोळ निस्तरला असला तरी याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केव्हा, असा मतदारांचा सवाल आहे.जिल्हा निवडणूक विभागाशी यासंदर्भात संपर्क साधला असता उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी ही बाब प्रथम: नाकारली. आरओंनी आयोगाला पाठविलेले पत्राची कॉपी दाखविल्यावर मात्र, त्यांनी अमरावती व तिवसा विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रामधील आकडेवारीमध्ये तफावत आल्याची बाब त्यांनी मान्य केली. आयोगाद्वारा पारदर्शी कारभार व एकेका मताची पडताळणी व सर्व मेळ जुळविण्याला महत्त्व दिले जातात. यासाठी आयोगाद्वारा एका लोकसभा मतदारसंघात किमान एक कोटीवर खर्च केला जात असताना दर्यापूर वगळता बाकी सर्व मतदारसंघांत मतदानातील आकडेवारीचा घोळ झालेला असल्याचे वास्तव आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान झाले. यादिवशी रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती लोकसभेसाठी ११ लाख ४ हजार ९३६ मतदान झाल्याचे जाहीर केले. यामध्ये ६ लाख २ हजार ८ पुरूष व ५ लाख २ हजार ९२१ स्त्री व इतर ७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ही ६०.३६ टक्केवारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १९ एप्रिल रोजी आरओंद्वारा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना झालेल्या मतदानाचा मेलदेखील करण्यात आला. त्यामध्ये फॉरमॅट ‘ए’ व ‘बी’ सादर करण्यात येत असल्याचे आरओ शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले. मीडिया सेलद्वारा झालेल्या मतदानाची हीच आकडेवारी सर्व माध्यमांना देण्यात आली. विशेष म्हणजे आयोगाद्वारा यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत संबंधित ‘एआरओं’ना आयोगाच्या सुविधा पोर्टलमध्ये झालेल्या मतदानाची माहिती आॅनलाईन भरावयाची होती. त्यानुसार सर्व एआरओंद्वारा ही प्रक्रिया करण्यात येऊन माहिती सुविधा पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यानंतर आरओंनी अंतिम मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध केली होती.अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही २३ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आला व विजयी उमेदवारास प्रमाणपत्र देण्यात आले. पहिल्या दोन उमेदवारांमध्ये ३६,९५१ मतांची तफावत असल्याने ११ मतांच्या घोळाकडे दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे. मतमोजणीअंती सर्व उमेदवारांना टपाली व्यतिरिक्त एकूण १० लाख ९९ हजार ७४७ वैध मते व ५ हजार २०० नोटा असे एकूण ११ लाख ४ हजार ९४७ मते असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच मतदानानंतर जाहीर मतांच्या तुलनेत मतमोजणीत ११ मतांचा घोळ यात झाल्याची बाब पुढे आली आहे. यासाठी दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याऐवजी घोळ निस्तरला यातच निवडणूक विभाग धन्यता मानत आहे, ही दुर्देवाची बाब आहे.आयोगाने पुन्हा दिली ‘सुविधा’ची लिंकमतदानाचे १८ एप्रिलला सर्व एआरओंना झालेल्या मतदानाची माहिती आयोगाच्या सुविधा पोर्टवर आॅनलाईन अपलोड करायची होती. त्यामुळे सर्व एआरओद्वारा विधानसभा निहाय माहिती भरण्यात आली. त्यानंतर आरओ शैलेश नवाल यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी झालेले अंतिम मतदान जाहीर केले. मात्र काही दिवसांनी आयोगाने पुन्हा सुविधा पोर्टलसाठी लिंक दिली. यावेळी तफावत असलेल्या मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी त्यामध्ये भरण्यात आली.त्यामुळे आरओंनी जाहीर केलेले मतदान व सुविधावरील मतदानात फरक दिसून येत आहे. यावर आयोग काय भूमिका घेते याकडे सर्वाचर लक्ष आहे.लोकसभा मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाची आम्ही सुविधावर पडताळणी केली. मतदानाची व मतमोजणी दरम्यानची आकडेवारी ही जुळलेली आहे.- शैलेश नवाल,निवडणूक निर्णय अधिकारीसंबंधित एआरओंनी दिलेल्या माहितीनुसार व सुविधा पोर्टलनुसार आयोगाला अहवाल पाठविण्यात आला. आयोगाने पुन्हा लिंक दिल्यामुळे काही एआरओंच्या आकडेवारीची दुरूस्ती करण्यात आल्याने तफावत दिसत आहे. मात्र, आकडेवारी जुळलेली आहे.- शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :Electionनिवडणूक