शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यात मतदान शांततेत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 10:33 IST

जिल्ह्यात मतदान शांततेत प्रारंभ अमरावती प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदान शांततेत सुरू झाले.

ठळक मुद्देदिवसभर ३६ ते ३८ अंश तापमानाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यात मतदान शांततेत प्रारंभ अमरावती प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदान शांततेत सुरू झाले. दोन दिवसांपासून सूर्याचा ताप कमी झाला आज दिवसभरात ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानासाठी बाहेर पडण्याचा उत्साह सकाळपासून कायम आहे. सकाळी नऊ वाजता हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात टक्के मतदान झाले ही टक्केवारी संथ असली तरी तापमानाने दिलासा दिल्यामुळे दिवसभरात मतदानाची टक्केवारी समाधानकारक राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. अद्याप अनुचित प्रकाराची कुठेही घटना पुढे आलेली नाही. शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे आठ मतदारसंघ येतात. त्यापैकी धारणी व मेळघाटातील आदिवासी रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याने आणि यंदा एकंदरच प्रचाराला वेळ कमी मिळाल्यामुळे येथील टक्केवारी जेमतेम राहील अशी शक्यता आहे. लग्नाची दाट तिथी असल्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांची सायंकाळी मतदानासाठी गर्दी होणार असल्याची चिन्हे आहेत. भाजप-सेना युतीचे आनंदराव अडसूळ काँग्रेस महा आघाडी समर्थित नवनीत राणा यांच्यात थेट लढत आहे. वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे व बसपाचे अरुण वानखडे आपल्याकडे किती मते वळवतात याचाही अंदाज राजकीय जाणकार घेत आहेत युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचे मुंबई येथील मतदार यादीत नाव असल्याने ते अमरावतीला मतदान करणार नाहीत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019