शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आरागिरणी कारवाईत राजकीय दबावतंत्र

By admin | Updated: March 28, 2016 00:10 IST

वलगाव मार्गालगतच्या ‘नेहा वूड इंडस्ट्रिज’ आणि रेवसा येथील ‘वाह ताज’ आरागिरणीत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षांची कत्तल करुन ...

वनाधिकारी त्रस्त : अवैध लाकूड कटाईवर अंकुश लागणार कसा?अमरावती : वलगाव मार्गालगतच्या ‘नेहा वूड इंडस्ट्रिज’ आणि रेवसा येथील ‘वाह ताज’ आरागिरणीत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षांची कत्तल करुन आडजात लाकूड आणल्याप्रकरणी वनविभागाने मागील आठवड्यात धाडसत्र राबविले होते. मात्र, कारवाई करताना वनाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अवैध लाकूड कटाईवर अंकुश लावायचा कसा? असा प्रश्न वनाधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.आडजात लाकू ड कटाईला ‘ब्रेक’ असताना शहरातील आरागिण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे लाकूड आणले जात असल्याच्या टीप्स वनविभागाला मिळाल्या. या माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आरागिरण्या तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वनसंरक्षक, वडाळीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी संयुक्तपणे धाडसत्र राबवून आरागिण्या तपासण्याची मोहीम हाती घेतली. मागील आठवड्यात सहा आरागिण्यांची तपासणी केली असता दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड असल्याचे दिसून आले. प्रथमदर्शनी ‘नेहा वूड’ आणि ‘वाह ताज’ नामक आरागिरण्यांवर वनगुन्हे दाखल करण्यात आलेत.मात्र, ही कारवाई होऊ नये, यासाठी आरागिरणी संचालकांकरिता राजकीय व्यक्तिंकडून दबावतंत्र वापरले जात आहे. परिणामी रेवसा येथील वाह ताज आरागिरणीत अवैध लाकूड जप्त केले असताना मूळ मालकांवर कारवाई न करता अ. करीम अ. जलील या सामान्य व्यक्तिच्या नावे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरागिरण्यांवर कारवाई न करण्याचा दबाव वनाधिकाऱ्यांवर येत असल्याने वनविभागासमोर पेच निर्माण झाला आहे. रेवसा येथील आरागिरणीत लाखो रूपयांचे आडजात लाकूड ताब्यात घेतले असताना राजकीय दबावामुळे २० घनमीटर लाकूड जप्त केल्याचे रेकॉर्डवर दाखविण्याचा प्रसंग ओढवला. याबाबत वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मालकांची साखळीआडजात लाकूड कटाई असो वा अवैध लाकूड व्यवसाय करण्याकरिता आरागिरणी मालकांची साखळी बनलेली आहे. व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी अगोदर वनाधिकाऱ्यांना हाताशी घेतले जाते. किंबहुना अधिकाऱ्यांनी नकारात्मक भूमिका घेतली की त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी आरागिरणीचे मालक राजकीय आश्रयाला जातात. हाच नेमका प्रकार आरागिरण्यांवर कारवाई दरम्यान झाला आहे. आरागिरण्यांवर कारवाई होऊ नये, यासाठी काही आमदारांचे वनाधिकाऱ्यांवर दबावतंत्र वाढत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.