शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम निबंधकाविरुद्ध राजकीय पक्ष एकवटले

By admin | Updated: March 18, 2016 00:21 IST

सहदुय्यम निबंधकाने पत्रकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा मुद्दा आता चांगलाच तापला असून निबंधकाला अटक करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी,

‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करा : आंदोलनाचा इशारासुनील देशपांडे  अचलपूरसहदुय्यम निबंधकाने पत्रकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा मुद्दा आता चांगलाच तापला असून निबंधकाला अटक करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आरपीआय (आ.), रिपाइं (ग), मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा इत्यादी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. येथील परवानाधारक मुद्रांक विक्रेता व तहसील कार्यालयानजीकच्या संगणक व झेरॉक्स व्यावसायिकांमधील वादावर सहदुय्यम निबंधक अर्जुन बडधे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारद्वय राज इंगळे व आशीष गवई गेले असता त्यांना बडधे यांनी अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात ११ मार्च रोजी पोलीस स्टेशनला तक्रारही देण्यात आली होती. बडधे यांना त्वरित अटक करून निलंबित करावे, या मागणीसाठी अचलपूर-परतवाड्यातील पत्रकार आता आक्रमक झाले आहेत. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट लावण्याची मागणीसहदुय्यम निबंधकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेले राज इंगळे व आशिष गवई हे दोन्ही पत्रकार दलित असल्यामुळे निबंधक बडधे यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. बडधे या पत्रकारांना आधीच ओळखत होते. त्यामुळे त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गवई, आरपीआय (गवई) शहराध्यक्ष किशोर मोहोड यांनी निवासी जिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना दिला आहे. विविध राजकीय पक्षांचा इशारादरम्यान मनसेचे तालुका अध्यक्ष प्रितेश अवघड व शहराध्यक्ष विवेक महल्ले यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुय्यम निबंधक बडधे यांच्या निलंबनाची मागणी आठवड्याच्या आत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पत्रकारांच्या मागणीला शिवसेना शहरप्रमुख विनय चतूर, प्रहारचे सुधाकर सावरकर, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र फिसके, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष वर्षा हिरुळकर, भाजपचे स्थानिक नेते श्रीधर क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा माधुरी शिंगणे, माजी नगरसेविका संगीता भोंडे, सामाजिक कार्यकर्ते मनीष लाडोळे आदींनी समर्थन दिले आहे. मंगळवारी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन पोलीस उपनिरीक्षक ब्राह्मणे व सहकारी स्वप्निल तंवर यांनी घटनास्थळ बघून पंचनामा केला. हा जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे बडधे यांना अटक करण्यात आलेली नाही. सात वर्षाच्या आत गुन्ह्याची सजा असल्यास समजपत्र देऊ शकतो. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्पुरती अटक करण्यात येते. - नरेंद्र ठाकरे (ठाणेदार), अचलपूर पोलीस स्टेशन.