शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस यंत्रणा बळकटीकरणासह दर्जेदार सुविधा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

पालकमंत्री यांचे प्रतिपादन, चिखलदऱ्यात नवीन पोलीस विश्रामगृहाचा शुभारंभ अमरावती : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत ...

पालकमंत्री यांचे प्रतिपादन, चिखलदऱ्यात नवीन पोलीस विश्रामगृहाचा शुभारंभ

अमरावती : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात. कोरोना साथीच्या काळात जोखीम पत्करून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या व आताही पार पाडत आहेत. पोलीस दलाचे अधिक बळकटीकरण करण्याबरोबरच नानाविध दर्जेदार सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी चिखलदरा येथे केले.

जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे चिखलदरा येथील हिरेकन पॉईंट येथे उभारण्यात आलेल्या पोलीस विश्रामगृहाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जि.प. समाज कल्याण सभापती दयाराम काळे, चिखलदरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजया सोमवंशी, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., श्वेता के. हरी बालाजी, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तहसीलदार माया माने, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर चिखलदऱ्याचे ठाणेदार राहुल वाढवे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस हेल्थ ॲप, क्लब व क्रीडा संकुल, विश्राम कक्ष, उपाहारगृह, महिलांसाठी स्वतंत्र जीम अशा अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यालाच जोडून चिखलदरा येथील विश्रामगृहाचीही दर्जेदार सुविधा निर्माण झाली आहे. चिखलदऱ्याच्या लौकिकाला साजेशी, अशी ही निर्मिती आहे. पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी धडाडीने या सुविधा अंमलात आणल्या, हे निश्चित वाखाणण्याजोगे आहे. यापूर्वीही रक्षादीपसारखा चांगला उपक्रम राबविला गेला. पोलीस कर्मचाऱ्यांवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, अविश्रांत काम व तणाव पाहता त्यांच्या आरोग्य व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी असे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील. अशा अनेकविध उपक्रमांना पोलीस दलाने चालना द्यावी. चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. श्वेता बालाजी यांनी त्यांच्या कल्पकता व उत्तम नियोजनातून येथील विश्रामगृहात सुविधांचे सौंदर्यीकरण करून त्यांचा दर्जा उंचावला, असे त्यांनी सांगितले. यावेळी चिखलदरा उभारण्यात येणाऱ्या ‘स्काय वॉक’ची पाहणी पालकमंत्री यांच्याद्वारे करण्यात आली.