शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक अहिरेंची ‘रिव्हॉल्वर’ काढण्याची धमकी

By admin | Updated: September 17, 2016 00:16 IST

देवी-देवतांना उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या युवकाला भातकुली पोलिसांनी गुरूवारी रात्री ताब्यात घेतले.

गणोरीत संघर्ष : सीपीच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, धार्मिक भावना दुखावल्याअमरावती : देवी-देवतांना उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या युवकाला भातकुली पोलिसांनी गुरूवारी रात्री ताब्यात घेतले. मात्र, नागरिकांचा रोष पाहून पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे यांनी गर्दी पांगविण्यासाठी गावकऱ्यांना रिव्हॉल्वर काढण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. आरोपी भास्कर देवराव गावंडे (२६,रा.गणोरी) याला भातकुली पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गणोरीवासियांचे श्रद्धास्थान मोहम्मद खान महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त १७ ते २५ सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. महोत्सवादरम्यान जत्रा भरत असल्याने गणोेरीत भाविकांची मोठी गर्दी उसळते. मोहम्मद खान महाराज हे सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आहेत. गुरूवारी गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमानंतर गणोरीवासी या उत्सवाच्या नियोजनासाठी आले होते. दरम्यान आरोपी भास्कर गावंडे याने देवी-देवतांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. हाप्रकार बघून सर्व नागरिक संतप्त झाले. भाविकांनी भास्करला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, भास्कर कोणालाही जुमानत नव्हता. त्यामुळे शेकडो गणोरीवासियांनी भातकुली पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तेथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना याप्रकाराबाबत सांगितले. तेव्हा तक्रार करण्याकरिता जमावाने का आलात? अशी विचारणा करून तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दमदाटी केली. पश्चात पोलिसांनी गणोरीतील नागरिकांच्या तक्रारीवरून आरोपी भास्कर गावंडेविरूद्ध भादंविच्या कलम २९५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. यावेळी भातकुली ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांनी गणोरीत जाऊन आरोपी भास्करला ताब्यात घेतले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने तणावजन्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पीएसआय अहिरेंनी गर्दी पांगविण्यासाठी रिव्हॉल्वर काढण्याची धमकी दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस ठाण्यात नेले व गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पीएसआय पंकज दाभाडे करीत आहे. दत्तात्रय मंडलिक यांचे कौशल्य अन् सतर्कतागणोरी या गावात रात्री १० च्या सुमारास निर्माण झालेला तणाव हाताळायला भातकुलीचे ठाणेदार अपयशी झाल्यानंतर ठाण्यात पोहोचलेले शेकडो लोक बिथरले होते. यासंबंधाने गावकऱ्यांनी संपर्क साधल्यावर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांनी गावात तत्काळ जादा कुमक पाठविली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थिती नियंत्रणात येऊ लागताना, पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे यांनी गावकऱ्यांना संताप येणारी भाषा वापरली. बाचाबाची वाढली. अहिरे यांनी गावकऱ्यांवर बंदुक रोखली. जमाव जाम भडकला. पोलिस वाहन जाळले जाण्यापर्यंतची भीषण स्थिती निर्माण झाली. यांसबंधाची माहिती पोलीस आयुक्तांना मिळताच त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कौशल्यपूर्णरीतीने आणि सतर्कतेने स्थिती हाताळली. अघटीत टळले. आयुक्तांच्या या सहकार्यामुळे गणोरी गावात निर्विघ्नपणे धार्मिक सप्ताह सुरू होऊ शकला. गावकऱ्यांनी मंडलीक यांचे अभिनंदन केले.