शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीच्या तयारीत लागली तरुणाई

By admin | Updated: May 27, 2014 00:23 IST

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी तरुणाईने व्यायामाच्या सरावाला सुरुवात केली आहे. दररोज खुल्या मैदानावर तरुणाई या पोलीस

शिपायाची शेकडो पदे : क्रीडांगणावर सराव, तरुणीही मागे नाहीत

अमरावती : महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी तरुणाईने व्यायामाच्या सरावाला सुरुवात केली आहे. दररोज खुल्या मैदानावर तरुणाई या पोलीस भरतीसाठी सराव करताना दिसत आहे.

अमरावती विभागात सुमारे ८९८ जागा पोलीस शिपायाच्या भरायच्या आहेत. यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रशानाने जागा भरतीची घोषणा केली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ मे होती. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २६ मे होती. या भरतीसाठी इयत्ता बारावी अथवा पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात शिपाई पदाच्या ८१ जागा भरल्या जाणार आहेत. अमरावती ग्रामीण पोलिसांत २५0 पदे, बुलडाणा ग्रामीणमध्ये १७५, वाशीम ग्रामीणमध्ये ११६, यवतमाळ ग्रामीणमध्ये २७६ शिपाई पदाच्या जागा भरावयाच्या आहेत. यासह राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ अमरावती येथे २७ शिपाई पदासाठी भरती होणार आहे.

अकोला ग्रामीण पोलिसांमध्ये शिपाई पद रिक्त नसल्याने येथे पदभरती होणार नाही.

या पदभरतीसाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणाई पोलीस भरतीच्या तयारीला लागली आहे. शारीरिक व्यायामाच्या सरावासोबतच लेखी परीक्षेचीही तयारी सुरु केली आहे. यासाठी पोलीस भरती संदर्भातील पुस्तकांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली आहे. यात तरुणींनीही पुढाकार घेतल्याचे दिसून येते. शहरातील प्रत्येक खुल्या मैदानात सध्या सराव करताना तरुणाई दिसत आहे.