शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाच्या अफवेने पोलिसांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:02 IST

कॉटन मार्केट परिसरातून तीन बालक बेपत्ता झाल्याची तक्रार आई-वडील नोंदवीत असतानाच ते तीन बालक गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचले.

आनंदाश्रू : पालकानंतर बालकही पोहचले ठाण्यातअमरावती : कॉटन मार्केट परिसरातून तीन बालक बेपत्ता झाल्याची तक्रार आई-वडील नोंदवीत असतानाच ते तीन बालक गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, या अपहरणाच्या बनावट घटनेमुळे पोलिसांची ताराबंळ उडाली होती, हे विशेष.गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग नगरातील रहिवासी ८ ते ११ वयोगातील बालक हे कॉटन मार्केट परिसरातील एका व्यावसायिकांकडे शितपेयाचे कॅरेट ट्रकांमध्ये चढविण्याचे काम करतात. दररोजप्रमाणे ते तीन बालके मंगळवारी सकाळी काम करण्यासाठी गेले. मात्र, रात्र होऊनही ते तिन्ही बालके घरी न पोहचल्याने आई-वडिलांना चिंता वाटू लागली होती. तिन्ही बालकांच्या आई-वडिलांनी नातेवाईक आणि ओळखीतील नागरिकांच्या घरी शोधाशोध सुरु केली. मात्र, तिन्ही बालके कोठेही आढळून आले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी बालकांच्या आई-वडिलांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. ते तक्रार देत असतानाच अचानक ते तिन्ही बालके पोलीस ठाण्यात दाखल झाली. ते रात्रभर कुठे होते, याबाबत ठाणेदार अर्जून ठोसरे यांनी बालकांनी विचारणा केली असता एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला नास्ता करण्याचे आमिष दाखवून सोबत नेले आणि तिन्ही जणांनी मिळून आमचे हातपाय बांधले व एका पोत्यात टाकून वाहनात घेऊन गेल्याचे त्या बालकांनी पोलिसांना सांगितले. मात्र, त्यांनी ज्या ठिकाणी आम्हाला ठेवले होते. त्या ठिकाणी एक चाकू सापडला आणि आम्ही आमची सुटका करून घेतल्याचे बालकांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर आम्ही बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात मदत मागण्यासाठी गेलो. तेथून पोलिसांनी दुपारी आम्हाला अमरावतीत पाठविले. बालकांनी अपहरणाचा असा बनाव सांगताच पोलिसांची तारांबळ उडाली.बालकांनी अपहरणाची खोटी माहिती पोलिसांना दिली. त्याची विचारपूस करण्यात आल्यावर ते बालक मंगळवारी कामावर पैसे मिळाल्यानंतर फिरायला गेले होते. बुधवारी ते परत अमरावतीत आले. आई-वडिलांच्या भीतीमुळे त्यांनी अपहणाची खोटी कहाणी पोलिसांना सांगितली. - अर्जुन ठोसरे, प्रभारी ठाणेदार, गाडगेनगर पोलीस ठाणे.