शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

युवकाविरोधात पोलिसात तक्रार

By admin | Updated: April 12, 2015 00:26 IST

गहाण खताचे शासकीय नियमाप्रमाणे शुल्क न घेता आगाऊ पैशांची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकाला विरोध करणाऱ्या ..

तो विचारतो जाब : भ्रष्टाचाराविरूद्ध केला होता आवाज बुलंदअमरावती : गहाण खताचे शासकीय नियमाप्रमाणे शुल्क न घेता आगाऊ पैशांची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकाला विरोध करणाऱ्या सुशिक्षित युवकाविरुध्द पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. सहायक दुय्यम निबंधक कार्यालय मागील दोन महिन्यांपूर्वी तहसील कार्यालय परिसरात मूळ जागेत आणण्यात आले असले तरी दलालांच्या कचाट्यातून याची मुक्तता झालेली नाही. हे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला असून देव-घेव केल्याशिवाय येथे खरेदी विक्रीचे काम होत नाही. या कार्यालयाच्या गोविंद अमरचंद चरपटे या युवकाचे झेरॉक्स दुकान आहे. पैसे जादा होत असल्याची कुणी तक्रार घेऊन आल्यास चरपटे कार्यालयात जाऊन जाब विचारत असतो. त्यामुळे दलाल, सहाय्यक दुय्यम निबंधकाला तो अडथळा वाटत असे. शुक्रवारी शंकर विश्वनाथ ठाकरे (ईसेगाव) यांच्या शेताचे गहाण खताचे कामाचे ३२० रुपयात झाले असताना दुय्यम निबंधकाने ६०० रुपये मागितले. ठाकरे हे चरपटे यांच्या दुकानात गेले व घडलेली हकिकत सांगितली. चरपटे यांनी दुय्यम निबंधकाला याचा जाब विचारला. त्यांनी चरपटे यांना हाकलून लावले. त्याचेविरुध्द दलाल व दुय्यम निबंधक अर्जुन जगन्नाथ बरडे यांनी अचलपूर ठाण्यात तक्रार केली.