शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आॅर्केस्ट्रा तिकीट विक्रीत पोलीस व्यस्त

By admin | Updated: January 21, 2017 00:12 IST

पोलीस कल्याण निधीच्या मदतीसाठी आयोजित आॅर्केस्ट्रा कार्यक्रमाची तिकीट विक्री युद्धस्तरावर सुरू आहे.

वेलफेअरच्या निधीसाठी कार्यक्रम : अर्धेअधिक पोलीस वसुलीत मग्नअमरावती : पोलीस कल्याण निधीच्या मदतीसाठी आयोजित आॅर्केस्ट्रा कार्यक्रमाची तिकीट विक्री युद्धस्तरावर सुरू आहे. या कामात अर्धेअधिक पोलीस तिकीट विक्रीच्या वसुलीत गुंतल्यामुळे पोलीस विभागातील बहुतांश कामकाज व तपासकार्य थंडावले आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना या आॅर्केस्ट्रा कार्यक्रमानिमित्त प्रत्येक ठाणेदाराला १५ लाखांचे 'टागेट' देण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या माध्यमातून तब्बल दीड कोटींचा निधी गोळा होणार असून तो निधी पोलीस कल्याण निधीसाठी उपयोगात आणणार आहे. २० जानेवारीपासून ४ दिवस या आॅर्केस्ट्राचे आयोजन केले असून यामध्ये सिनेस्टार दीपाली सय्यद व प्रज्ञा जाधव यांची प्रमुख भूमिका राहील. मराठी ठसकेबाज लावण्या, धमाल नृत्यांचा मंत्रमुग्ध करणारा मनोरंजक कार्यक्रम अशी रुपरेषा या आॅर्केस्ट्राची राहील. अनेक वर्षांपासून पोलीस विभागातर्फे अशा प्रकारच्या कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. मात्र, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी वेलफेअरचा पैसा वाढविण्याच्या उद्देशाने यंदा आॅर्केस्ट्राचे आयोजन केले आहे. या आॅर्केस्ट्राच्या तिकिटाची किंमत ही ३०० रुपये असल्यामुळे बहुतांश नागरिक तिकीट खरेदीकरिता आनाकाणी करीत आहेत. मात्र, या तिकीट विक्रीसाठी पोलिसांनी व्यापारी वर्गास वेठीस धरले आहे. सर्वसामान्य हातगाडीचालकांनाही याचा फटका बसत आहे. सर्वच पोलीस तिकीट विक्रीसाठी जोमाने काम करीत असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)पोलीस कल्याण निधीच्या मदतीसाठी या आॅर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ पोलिसांच्या कल्याणासाठीच केला जाईल. पोलिसांना तिकीट विक्रीचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. मात्र, सौजन्यपूर्णरीत्या तिकीट विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - दत्तात्रय मडंलिक, पोलीस आयुक्त