शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वलगाव बसस्थानकाची दुर्दशा

By admin | Updated: December 5, 2015 00:26 IST

चार वर्षांपूर्वी वलगाव येथील बसस्थानकाचे मोठ्या थाटात लोकार्पण झाले. परंतु ज्या सुविधा येथे द्यायला पाहिजे त्या कोणत्याच सुविधा बस स्थानकामध्ये न दिल्यामुळे ...

रस्ते नाही : बसही थांबत नाही, प्रवाशांची गैरसोयटाकरखेडा संभू : चार वर्षांपूर्वी वलगाव येथील बसस्थानकाचे मोठ्या थाटात लोकार्पण झाले. परंतु ज्या सुविधा येथे द्यायला पाहिजे त्या कोणत्याच सुविधा बस स्थानकामध्ये न दिल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकावरच मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे बसचालकदेखील आत बस आणण्याचे टाळतात. त्यामुळे रस्त्यावरूनच बस निघून जाते. परिणामी प्रवाशांना बसस्थानकाऐवजी भर रस्त्यावरच बसची वाट पाहत थांबावे लागते.अमरावती ते परतवाडा मार्गावर आसलेल्या वलगाव हे अति महत्त्वाचे ठिकाण समजले जाते. वलगावशी दर्यापूर, अकोट, चांदूरबाजार व परतवाडा हे तीन मार्ग जोडले आहे. या तीनही महत्त्वाच्या मार्गावर जाताना वलगाव येथून प्रवास करावा लागतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव केंद्रस्थानी असलेल्या वलगाव येथे नव्याने बसस्थानक सुरू करण्यात आले. चार वर्षांपूर्वी बसस्थानक सुरू झाले. परंतु सुविधा देण्याचे आश्वासन दिले त्याची पूर्तता आजवरही झालेली नाही. नव्याने बांधलेल्या बसस्थानकामध्येही खड्डे पडत आहेत. बसस्थानक परिसरात अद्यापही डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे बहुतांश बस स्थानकावर न येता रस्त्यावरच थांतात. याचाच फायदा खासगी बसचालक देखील घेत आहे. काही बसेस आतमध्ये येत नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी बसमध्ये प्रवास करावा लागत आहे. अखेर या बसस्थानकाला चांगले दिवस कधी येणार, अशा भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत. याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिरुध्द उगले यांनी निवेदन देऊन बसस्थानकावर सोई, सुविधा देण्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापही याची दखल परिवहन विभाग प्रशासनाने घेतलेली नाही. (वार्ताहर)