शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

गणोरी भातकुली रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: June 14, 2015 00:17 IST

भातकुली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे तहसील कार्यालयार्पंत सर्वच सोई उपलब्ध आहेत.

पायी चालणेही कठीण : गावकऱ्यांची डांबरीकरणाची मागणीभातकुली : भातकुली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे तहसील कार्यालयार्पंत सर्वच सोई उपलब्ध आहेत. परंतु गणोरीवासीयांना त्याचा फायदा होत नाही. गणोरी हे गाव अद्यापही भातकुलीला पक्क्या रस्त्याने जोडलेले नाही. गणोरी-भातकुली रस्त्याच्या खडीकरणासाठी मंजूर झालेले ८० लक्ष रुपये पूर्णत: पाण्यात गेल्याची ओरड आहे. गणोरी हे गाव जिल्ह्यात प्रसिध्द आहे. ते महंमदखान महाराजांमुळे हिन्दू-मुस्लिम एकतेचे प्रतीक अशी या गावाची ओळख आहे. पण लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही हे गाव भातकुलीशी पक्क्या रस्त्याने जोडले गेले नाही. परलाम, उत्तमसरा, कवठा, निंभोरा, शिवणी, शिवगाव, बहाद्दरपूर, खरबी, खल्लार इत्यादी गावातील नागरिकांना भातकुलीला जायचे झाल्यास नाहक फेऱ्याने जावे लागतात. वास्तविक पाहता गणोरी-भातकुली हे रस्ता केवळ ४ कि.मी.चे अंतर आहे. म्हणजे अवघ्या ५ मिनिटांमध्ये भातकुली गाठणे सहज शक्य आहे. परंतु रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे २० ते २५ कि.मी. चा फेरा आगाऊ मारावा लागतो. गणोरी - भातकुली हा राज्य ग्रामीण मार्ग क्र. ८२ असून लवकरात लवकर या मार्गावर डांबरीकरण करण्यात यावे व तालुक्यातील जनतेला नाहक त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी गणोरी, परलाम, उत्तमसरा, कवठा, निंभोरा, शिवगाव, शिवणी, खरबी, बहाद्दरपूर येथील नागरिकांनी केली आहे. पुढे पावसाळा आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुर्दशा होईल. नागरिकांना व वाहनधारकांना या मार्गाने जाणे-येणे कठीण होईल. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी या मार्गाने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या व प्रवाशांच्यावतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)