शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘नवाब’ची सीआयडी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:31 IST

नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देसहायक वनसंरक्षकांची मागणी : प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र

आॅनलाईन लोकमतअमरावती : नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे. जबाबदारी असलेल्या वनाधिकाऱ्यांनीच चौकशीची मागणी केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले असून, याबाबत वरिष्ठ कोणता निर्णय घेतात, याकडे वनविभागाच्या नजरा लागल्या आहेत.प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांच्याकडे २० मार्च रोजी एसीएफ कविटकर यांनी पत्र दिले. नागपूर येथील नेचर व वन्यजीव संस्थेचे त्यापूर्वी सुजोग चव्हाण यांनी २० फेब्रुवारी रोजी वन्यजीव विभागाकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार, नवाब वाघ हा नोव्हेंबर २०१७ पासून पोहरा जंगलात दिसला नाही. तो कटलाबोडी, बोर क्षेत्रात परतल्याचे कविटकर खोटे बोलत आहेत. नागपूर येथील एका वरिष्ठ वनाधिकाºयाने नवाब हा बोर, कटलाबोडी भागात असल्याचा कोेणताही पुरावा नसल्याचे सांगितले. त्याची वीजप्रवाहाने शिकार करण्यात आली असून, शिकारी हे एसीएफ कविटकर यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे याप्रकरणी कविटकर सारवासारव करीत असल्याचे सुजोग चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले होते.दरम्यान, तक्रारदाराने नवाबची वीजप्रवाहाने शिकार झाल्याचे आजतागायात का दडवून ठेवले? शिकाऱ्यांची नावे तक्रारदारांकडून घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. तक्रारदारांचे भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन २६ फेब्रुवारीच्या महिनाभरापूर्वी ते आजतागायत कॉल डिटेल्स घ्यावेत. तक्रारदाराने वनविभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीहून संपर्क साधला? याची चौकशी करावी आणि पुरावे आढळल्यास माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे कविटकर यांचे म्हणणे आहे. सुजोग चव्हाण यांच्या तक्रारीत तथ्य न आढळल्यास त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका कविटकर यांनी पत्राद्वारे मांडली आहे. नवाब वाघ गायब झाल्याप्रकरणी व्याघ्र प्रकल्प आणि वनविभाग असे द्वंद पेटले असून, खरेच नवाब गेला कुठे, हे स्पष्ट होईल.खोट्या तक्रारीमागे बड्या वनाधिकाऱ्याचा हातनवाब गायब झाल्याप्रकरणी सुजोग चव्हाण यांनी खोटी तक्रार दिली असून, यामागे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय कविटकर यांनी व्यक्त केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कंत्राटी कर्मचारी दास जयदीप यांनी सोशल मीडियावर कुणाच्या इशाऱ्यावरून बातमी अपलोड केली, याचा शोध घेतल्यास वास्तविकता समोर येईल, असे अशोक कविटकर यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.एनजीओ सुजोग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. नवाव स्वगृही परतल्याचा अहवाल यापूर्वीच वरिष्ठांना पाठविला आहे. नवाब वाघाची शिकार झाल्याप्रकरणी तक्रारकर्त्याला ठोस पुरावे मागितले असून, ते अद्यापही मिळालेले नाहीत.- हेमंत मीणाउपवनसंरक्षक, अमरावती.