शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शाळांमध्ये राबविणार वृक्षारोपण योजना

By admin | Updated: July 18, 2015 00:12 IST

राज्यातील प्रत्येक शाळेत भौतिक सुविधाविषयक निकषाचे पालन बंधनकारक आहे.

पर्यावरणविषयक जागृती : ५ जून ते ३१ आॅगस्टदरम्यान वन महोत्सवअमरावती : राज्यातील प्रत्येक शाळेत भौतिक सुविधाविषयक निकषाचे पालन बंधनकारक आहे. यात शाळेच्या विद्यार्थ्यांना सावली मिळण्यासाठी आवारात वृक्षांची लागवड करणे याचा अंतर्भाव आहे. पर्यावरण संवर्धन व त्याबाबत जागृती करण्यासाठी ५ जून ते ३१ आॅगस्ट दरम्यान वन महोत्सव साजरा केला जातो. या कालावधीत प्रत्येक शाळेत वृक्षारोपण करण्याचे आदेश शालेय विभागाचे उपसचिव अविनाश साबळे यांनी १५ जुलै रोजी दिले आहेत. या वनमहोत्सवाच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यामध्ये नवे, वन्यप्राणी, जैवविविधता व दुर्मीळ अशा वनसंपदेचे रक्षण व त्याचे संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयात जाणीव व आवड निर्माण व्हावी यासाठी ही वृक्षारोपण योजना शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. सन २०१५-१६ मधील पावसाळ्यात वृक्षारोपण योजनेंतर्गत जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिका, नगरपालिका इत्यादी शाळांमध्ये वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. तसेच वृक्षारोपणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक शाळेत २० रोपांचे पॅकेज वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून देण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये मिश्र रोपांचा समावेश राहणार आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सर्व शाळांना प्रोत्साहन म्हणून ३ रूपये प्रतिरोपाच्या वाहतूक खर्चासह देण्यात येणार आहे. वन आणि सामाजिक वनीकरण योजनांतर्गत एम. जी. नरेगा, रोहयो, वनमहोत्सव आणि कॅम्प अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेमधून रोपांची उपलब्धता केली जाणार आहे. यासाठी या विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून वाहतुकीचे नियोजन करून कमी खर्चात जवळच्या रोपवाटिकेपासून ते शाळेपर्यंत रोपे पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्ये तसेच खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं-अर्थसहाय्यित शाळांसाठी हा कार्यक्रम ऐच्छिक स्वरुपाचा राहणार आहे. १५ आॅगस्ट रोजी झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा, असे शासनाचे निर्देश आहेत. (प्रतिनिधी)वृक्षारोपणाच्या दृश्य परिणामासाठी शाळांची कार्यवाहीवृक्षारोपणानंतर रोपाचे किमान चार वर्षे, जनावरापासून रक्षण करणे, रोपांचे संरक्षण करणे, पाणीपुरवठा व कायमस्वरुपी देखभाल व संगोपनाची व्यवस्था.४झाडांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के राहील, या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे.४प्रत्येक शाळेत किमान १० विद्यार्थ्यांचा गट स्थापन करून ‘पर्यावरण रक्षक सेना’ तयार करण्यात यावी त्यांना पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन यासाठी प्रशिक्षण देणे.‘वृक्षदिंडी’त द्यावा लागणार गोषवारा‘वृक्षदिंडी’मध्ये मागील तीन वर्षांत किती झाडे लावलीत, त्यापैकी किती झाडे जगली याची माहिती वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून संकलित केलेली माहिती योजनेमार्फत सादर करण्यात येणार आहे. ज्या शाळा वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण, देखभाल अत्युत्तम करेल यासाठी बक्षीस योजना राबविली जात आहे. शासनाकडून वृक्षारोपणाचा अहवाल मागितल्याने केवळ वृक्षारोपण करून भागणार नाही तर लावलेली झाडे जगविण्याची जबाबदारी देखील सांभाळावी लागणार आहे.