शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:51 IST

पिस्तुलातून गोळी झाडून एका किराणा व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री अन्सारनगरात घडली. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी एहतेशाम ऊर्फ आलीशान अहमद मोहम्मद फारूक (२५, रा. अन्सारनगर, रजा मशीदजवळ) याला अटक केली. आलीशान हा नावेद बिल्डर हत्याकांडातील आरोपी होता.

ठळक मुद्देअन्सारनगरातील घटना : नावेद बिल्डर हत्याकांडातील आरोपी होता आलीशान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पिस्तुलातून गोळी झाडून एका किराणा व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री अन्सारनगरात घडली. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी एहतेशाम ऊर्फ आलीशान अहमद मोहम्मद फारूक (२५, रा. अन्सारनगर, रजा मशीदजवळ) याला अटक केली. आलीशान हा नावेद बिल्डर हत्याकांडातील आरोपी होता.अन्सारनगरातील रहिवासी मोहम्मद शकील मोहम्मद अकील अन्सारी (४३) यांचे किराणा दुकान असून, त्यांच्या दुकानासमोर काही तरुण हुल्लडबाजी करीत होते. त्यांनी यावेळी आलीशानला हटकले. दुकानासमोर हुल्लडबाजी करू नका, दुकानासमोर गुन्हेगार बसवू नका, असे नागरिक म्हणत असल्याचे मोहम्मदने सांगितले. त्यावेळी आलीशान वीट उचलून मोहम्मदच्या अंगावर धावून गेला, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आलीशान घरी गेला आणि पाच मिनिटांत पिस्तूल हाती घेऊन मोहम्मदच्या दुकानासमोर आला. आलीशानने मोहम्मदसमोर पिस्तुलात गोळ्या भरल्या आणि ते त्याच्या दिशेने ताणले.पिस्तूल ताणल्याचे पाहून मोहम्मद खाली बसला. त्यामुळे गोळी त्याला लागली नाही. यादरम्यान तेथे उपस्थित सज्जू आणि गोलू नामक इसम ओरडल्यामुळे आलीशान तेथून पळून गेला. या घटनेची तक्रार मोहम्मद शकीलने नागपुरी गेट पोलिसांत नोंदविली.पोलिसांनी आलीशान अहमदविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, २९४, ५०६ (ब) व ३/२५ आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आणि त्याला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी पोलिसांनी केली. पोलिसांना आलीशानकडून पिस्तूल अद्याप मिळालेले नाही.नावेद बिल्डर हत्याकांडातील आरोपीवलगाव रोड स्थित असोरीया पेट्रोल पंपासमोर घडलेल्या नावेद बिल्डर हत्याकांडात आलीशान अहमद हा आरोपी होता. हे हत्याकांड देशपातळीवर गाजले होते. या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू असताना फिर्यादी व आरोपी पक्षांचे वाद झाले होते. या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव होता. खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका झाली होती.हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना किराणा व्यापाºयाने हटकले असता, आरोपी आलीशानने पिस्तूल ताणले. त्याला अटक करण्यात आली आहे.- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, नागपुरी गेट पोलीस ठाणे.