शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मिनीमहापौरांच्या पुत्राजवळून पिस्टल जप्त

By admin | Updated: January 17, 2015 00:52 IST

वलगाव मार्गावरील हबिब नगरातून गुरुवारी रात्री १०.३० वाजता मिनी महापौर हाफिजाबी यांच्या मुलाजवळून गुन्हे शाखेच्या पथकाने एका पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करुन अटक केली.

अमरावती : वलगाव मार्गावरील हबिब नगरातून गुरुवारी रात्री १०.३० वाजता मिनी महापौर हाफिजाबी यांच्या मुलाजवळून गुन्हे शाखेच्या पथकाने एका पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करुन अटक केली. फिरोज शाह ऊर्फ भुऱ्या युसूफ शहा (२८,रा. हबीबनगर) असे, आरोपीचे नाव आहे.काही वर्षांपासून शहरात देशी कट्टयाचे चलन असल्याचे आढळून आले आहे. अनेक गुन्हेगार सर्रासपणे देशी कट्टयाचा वापर करुन दहशत पसरवीत आहेत. त्यातच गोळीबार झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. आता पोलीस विभाग सतर्क झाले असून देशी कट्टे व पिस्टल बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. दीड महिन्यांपूर्वी चांदणी चौकात झालेला गोळीबार तसेच नुकताच गुलिस्तानगरात आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गोळ्या झाडण्यात आल्या. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात एपीआय रवी राठोड, राजेश राठोड, किशोर महाजन नीळाकंठ चव्हाण, नागपुरी गेटचे पीआय गावंडे यांच्या पथकाने गुप्त माहितीवरुन गुरुवारी हबीबनगर नं १ चौकात पाळत ठेवून फिरोज शाहला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)नगरसेविका हाफिजाबीविरुध्द गुन्हे दाखलपोलीससूत्रानुसार फिरोजला अटक करण्यासाठी घेराव घातला होता. त्यावेळी नगरसेविका हाफिजा बी यांच्यासह २० ते २५ जणांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन देशमुख यांनी सरकारी पिस्तुलाचा धाक दाखविल्याने फिरोजच्या समर्थकांनी पलायन केले. या कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या नगरसेविका हाफिजाबी यांच्यासह २० जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले.