शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पिंंगळादेवी रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 00:29 IST

महाराष्ट्रातील पूर्ण शक्तीपीठापैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या पिंगळादेवीच्या गडावर विदर्भातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भावित भक्त दर्शन घेण्यासाठी येतात.

अपघाताची शक्यता : रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी लेहगाव : महाराष्ट्रातील पूर्ण शक्तीपीठापैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या पिंगळादेवीच्या गडावर विदर्भातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भावित भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. गोराळा पिंगळाई ते पिंगळादेवी गड रस्त्याची पार दयनीय अवस्थाा झाली असून या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे. नवरात्रमहोत्सव पूर्वी जर शासनाने हा जीवघेणा रस्ता केला नाही तर यावर्षी पार्किंगची व्यवस्था गडावर होवू देणार नाही. असा सनसनीत इशारा विश्वस्त मंडळाने दिला आहे. पिंगळादेवीच्या गाहवर वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात. या रस्त्यावरुन येणाऱ्यावर दररोज लहान मोठे अपघात होतात.रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे गडावर वाहन चढवतांना भाविकांना फार मोठी कसरत करावी लागते. येथे नवरात्री महोत्सवात फार मोठी यात्रा असते. भाविक मोठ्या संख्येने म्हणजे पर दिवशी दहा, पंधरा हजार भाविक येथे दर्शनाचा लाभ घेतात. येथे गर्दी असते. यावर्षी शासनाने हा रोड दुरुस्त केला नाही तर पार्किंगची व्यवस्था गडावर होवू देणार नाही तर ती खाली एक किलोमीटर अंतरावर करावी लागेल असा इशारा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोठे यांनी दिला. दर पांच वर्षानी निवडणूका येताते या निवडणूकीच्या प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करतात या ठिकाणी कार्यकर्त्यांना मेजवाणी देवून मेळावे घेतात आणि देवीचा आशीर्वाद घेवून निवडणूूकीत विजयी होतात. परतुं नंतर मात्र देवीकडे फिरुन ही पाहत नाही. या विभागाचे आमदार , खासदार आणि अधिकारी वर्ग देवीचे दर्शन घेवून जातात परंतु यांना हा जीवघेणा रस्ता का दिसत नाही ही खेदाची बाब आहे. या संदर्भात विश्वस्त मंडळाने या रस्ता दुरुस्ती संदर्भात अधिकारी वर्गाकडे निवेदने दिलीत. मात्र रस्त्याचे काम झाले नाही. (वार्ताहर)